आता घडवा कार्यकर्ते! आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे प्रशिक्षण शिबिर, स्वतः पवार राहणार उपस्थित

आता घडवा कार्यकर्ते! आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे प्रशिक्षण शिबिर, स्वतः पवार राहणार उपस्थित

राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची तयारी सर्व राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. यामध्ये मविआ आणि भाजप-शिवसेनेने देखील कंबर कसली आहे. भाजप-शिवसेना महायुतीच्या जागा वाटपाची प्राथमिक चर्चा सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादीने देखील आता तयारी सुरू केली आहे.

आता घडवा कार्यकर्ते! आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे प्रशिक्षण शिबिर, स्वतः पवार राहणार उपस्थित
Maharashtra Politics: रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांना मोठी ऑफर; म्हणाले ठाकरेंकडून...

आगामी काळात होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सामाजिक न्याय विभागातर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये १७ व १८ जूनला राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार, राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच इतर नेते शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.

आता घडवा कार्यकर्ते! आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचे प्रशिक्षण शिबिर, स्वतः पवार राहणार उपस्थित
Maharashtra Politics: धनंजय मुंडेंकडे नाशिकची जबाबदारी ? डावलल्याच्या बातम्यांबद्दल भुजबळ स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी पक्षाच्या राज्यातील सर्व आघाड्यांचे तीनशेहून अधिक प्रतिनिधी या शिबिरात सहभागी होणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, शिबिर संयोजक प्रा. सुनील मगरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर या शिबिराचे उद्‍घाटन अजित पवार यांच्या हस्ते पडेगाव येथील सिल्व्हर लॉनमध्ये १७ जूनला होणार आहे. तर शरद पवार यांच्या उपस्थिती शिबिराचा समारोप होणार आहे.

सध्याची राजकीय, सामाजिक परिस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेली लोकशाही मूल्ये, आरक्षण, शैक्षणिक सवलती आदी भाजपच्या माध्यमातून कशी पायदळी तुडवली जात आहेत, यावर शिबिरात चर्चा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका प्रभावीपणे मांडण्याच्या उद्देशाने सहा सत्रांत हे शिबिर होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com