मोदींचा फोटो ट्विट करत धनंजय मुंडे म्हणाले, हे ग्रहण कधी सुटणार? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यग्रहण बघण्यासाठी केरळला गेले होते. कोझीकोडमधल्या ढगाळ वातावरणामुळे त्यांना सूर्यग्रहण बघता आले नाही. त्यांनी ग्रहण बघता न आल्याची खंत ट्विटरद्वारे व्यक्त केली.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्यग्रहण पाहतानाचे फोटो ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी तोच फोटो ट्विट करत दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार असा प्रश्न केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सूर्यग्रहण बघण्यासाठी केरळला गेले होते. कोझीकोडमधल्या ढगाळ वातावरणामुळे त्यांना सूर्यग्रहण बघता आले नाही. त्यांनी ग्रहण बघता न आल्याची खंत ट्विटरद्वारे व्यक्त केली. त्यांनी ट्विट केले आहे की, 'अनेक देशवासियांसारखेच मलाही ढगाळ वातावरणामुळे सूर्यग्रहण बघता आले नाही. ग्रहण बघण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. पण ढगांमुळे मला सूर्य दिसला नाही. पण सूर्यग्रहणाचे काही क्षण मी कोझीकोडमध्ये बघितले, तर काही प्रमाणात ग्रहण मी लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून बघितले. तसेच तज्ञ्जांकडून या ग्रहणाबाबत अधिक माहितीही घेतली. 

'RSSचे पंतप्रधान भारतमातेशी खोटे बोलत आहेत'

मोदींनी कंकणाकृती सूर्यासोबतचा फोटो ट्विट केला होता. हाच फोटो ट्विट करत धनंजय मुंडेंनी म्हटले आहे, की आर्थिक डबघाई, बेरोजगारी, महिला सुरक्षा, सीएए, एनआरसीसाठी सुरु असलेला हिंसाचार, कायदा सुव्यवस्था अशी दिल्लीतील उगम पावलेले ग्रहणे कधी सुटणार आहेत.

सूर्यग्रहण बघता न आल्याने मोदींनी व्यक्त केली 'ही' खंत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Dhananjay Munde tweet about Solar eclipse and Narendra Modi