Jitendra Awhad On CM Shinde : "...असं पुन्हा कधीही करू नका"; आव्हाडांचा CM शिंदेंना प्रेमाचा सल्ला

NCP MLA Jitendra Awhad Advised CM Shinde over traveling by helicopter in bad weather rak94
NCP MLA Jitendra Awhad Advised CM Shinde over traveling by helicopter in bad weather rak94esakal

राजकीय वर्तुळात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होणे नवीन नाही. मात्र दोन राजकीय विरोधक हे चांगले मित्र असल्याची अनेक उदाहरणे देखील आपण पाहिले आहेत. असाच एक प्रकरा समोर आला आहे. राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर सत्ताधारी नेत्यांवर आरोप करणारे राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी एक खास पोस्ट केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र काम केलं असून याचा दाखला देत आव्हाडांनी मित्रभावनेने सल्ला दिला आहे. हवामान खराब असताना कधिही हॅलिकॉप्टर उडवू नये हे जागतिक अलिखित संकेत आहेत असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचं असल्याचेही आव्हाडांनी म्हटले आहे.

NCP MLA Jitendra Awhad Advised CM Shinde over traveling by helicopter in bad weather rak94
MPSC Exam Fees News : रोहित पवारांची फडणवीसांकडे मागणी, अजितदादांनी केली पूर्ण; दिल्या महत्वाच्या सूचना

आव्हाड म्हणाले की, "मुख्यमंत्री साहेब आपल्यामध्ये राजकीय मतभेद जरूर आहेत. मी हे विसरू शकत नाही की, आपण मुख्यमंत्री होण्यापूर्वी आपले अतिशय जवळचे स्नेहाचे संबंध होते.

"काल आपण हट्टाने हॅलिकॉप्टरचा पायलट नाही म्हणतं असताना, त्याला हवामान खराब असल्याचे सांगितले जात असतांना देखिल बळजबरीने त्याला हॅलिकॉप्टरने गावी जाण्यासाठी उड्डाण घेण्यास सांगितले. आपण हॅलिकॉप्टर साताऱ्याला उतरवलत नंतर आपण कुठे गेलात हे मला माहीत नाही." असेही आव्हाड म्हणाले.

NCP MLA Jitendra Awhad Advised CM Shinde over traveling by helicopter in bad weather rak94
Mumbai High Court : रस्त्यावरील खड्डे, उघडे मॅनहोल प्रकरण हायकोर्टात! मुंबईसह परिसरातील ६ मनपा आयुक्त कोर्टात हजर

"पण हवामान खराब असतांना कधिही हॅलिकॉप्टर उडवू नये हे जागतिक अलिखित संकेत आहेत. आपण हे का केलेत ते मला माहित नाही. पण, हे असं करणं महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि आपल्या वैयक्तिक दृष्टीने चुकीचे आहे. "सर सलामत तो पगडी पचास" अशी एक म्हण प्रचलित आहे." असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांचा प्रेमाचा सल्ला

"आपण अशी भूमिका घेणे किंवा असा हट्ट धरणे हे मला वैयक्तिकरित्या पटलेले नाही. कारण कोणी काहिही म्हणो आपण एकेकाळचे चांगले मित्र होतो. ह्या नात्यानेच मी हे लिहीत आहे. असे पुन्हा कधिही करू नका." असा प्रेमाचा सल्ला आव्हाडांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com