"तानाजी'च्या निमित्ताने "सिंहगड' चर्चेत 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 27 November 2019

"सिंहगड' हा बाबूराव पेंटर यांनी तयार केलेला चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लॅंप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

कोल्हापूर - कलामहर्षी बाबूराव पेंटर यांनी 1923 साली तयार केलेल्या "सिंहगड' या मूकपटाची चर्चा आता पुन्हा विविध माध्यमातून सुरू झाली आहे. बहुचर्चित "तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या निमित्ताने "सिंहगड' आणि बाबूराव पेंटर यांची या चित्रपटाच्या निर्मितीची कथा पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

"सिंहगड' हा बाबूराव पेंटर यांनी तयार केलेला चित्रपट अनेक दृष्टींनी महत्त्वपूर्ण ठरला. त्यातील रात्रीच्या लढाईचे चित्रीकरण त्याकाळी त्यांनी प्रज्योत दिव्याच्या (आर्क लॅंप) प्रकाशझोतात केले. विजेच्या प्रकाशात चित्रीकरण केलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. पन्हाळ्याच्या परिसरात केलेल्या चित्रीकरणामुळे तो बाह्यचित्रीकरणाच्या म्हणजेच आऊटडोअर शुटींग असणाराही पहिलाच चित्रपट ठरला. याच चित्रपटाच्या वेळी मुंबईला प्रेक्षकांची अलोट गर्दी लोटल्यामुळे तिचे नियंत्रण सरकारला करावे लागले. तेव्हापासून सरकारचे लक्ष चित्रपटाकडे वेधले गेले व या चित्रपटापासूनच चित्रपटावर करमणूक कर बसविण्यात आला. याच चित्रपटाच्या जाहिरातीसाठी बाबूरावांनी शिलामुद्रण केलेली 3.48 x 6.96 मीटर लांबी-रुंदीची भित्तिपत्रके तयार केली होती. ती चांगलीच प्रभावी ठरली.

यांनी साकारली होती तानाजीची भुमिका

साहजिकच या चित्रपटापासूनच थिएटरवर चित्रपटाच्या पोस्टर किंवा जाहिरातीची संकल्पना पुढे आली. चित्रपटाच्या शुटींगवेळी बाबूराव पेंटर स्वतः चित्रपटातील व्यक्तिरेखा कागदावर उतरत आणि नंतर त्या चित्रपटात जशाच्या तशा आणत. म्हणजेच सध्या शुटींगवेळी वापरली जाणारी "स्टोरी बोर्ड' ही संकल्पना त्यावेळी पेंटर यांनी पुढे आणली होती. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती ती बाळासाहेब यादव यांनी आणि स्वतः बाबूराव पेंटर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. ऐंशी वर्षाच्या शेलारमामांच्या भूमिकेत व्ही. शांताराम होते. दरम्यान, प्रभात फिल्म कंपनीनेही पुढे "सिंहगड' हा बोलपट निर्माण केला. त्याचे दिग्दर्शक व्ही. शांताराम होते. 

दृष्टीक्षेपात "सिंहगड' 

  • भारतातील पहिले आऊटडोअर शुटींग 
  • चित्रपटावर करमणूक कर सुरू झाला 
  • "स्टोरी बोर्ड' संकल्पना पहिल्यांदा आली 
  • चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी भित्तीपत्रके- पोस्टरची संकल्पना  

राज्य नाट्य स्पर्धेच्या बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा

‘तुघलक’ नाटकाचा देखणा प्रयोग 

‘विच्छा माझी पुरी करा’ तून चंदगडची पोरं हुश्शारचा संदेश 

‘लग्न शांतूच्या मेहुणीचं’ अस्सल ग्रामीण बाजातील नाटक 

‘थिंक पॉईंट’ नाटकात घेतलाय या प्रश्नांचा वेध 

एका फक्कड प्रयोगाची अनुभूती नटरंगने दिली 

राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Baburao Painter Sinhgad Movie Comes In Light Due To Tanhaji