esakal | Aryan Khan : सलमानला वाचवणारे...आता आर्यनची केस लढणारे अ‍ॅड. अमित देसाई कोण आहेत?
sakal

बोलून बातमी शोधा

Adv Amit Desai

सलमानला वाचवणारे...आता आर्यनची केस लढणारे अ‍ॅड. अमित देसाई कोण आहेत?

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : 'हिट अँड रन' केसमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची निर्दोष सुटका करण्यात प्रमुख भूमिका बजावणारे वरिष्ठ वकील अमित देसाई हे आता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची केस लढणार आहेत. मुंबई हायकोर्टात क्रिमिनल लॉयर असलेले देसाई नक्की कोण आहेत? जाणून घेऊयात....

हेही वाचा: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर?

सन २००२ मध्ये प्रचंड चर्चेत असलेल्या आणि गदारोळ माजवणाऱ्या हायप्रोफाईल 'हिट अँड रन' प्रकरणात अभिनेता सलमान खानला सत्र न्यायालयानं सन २०१५ मध्ये पाच वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली होती. कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आले. यावेळी इथं अॅड. अमित देसाई यांनी सलमान खानची केस हातात घेतली. त्यांच्या युक्तीवादानंतर सलमानला केवळ ३०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला त्यानंतर मुंबई हायकोर्टानं सबळ पुराव्यांअभावी सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती.

अॅड. अमित देसाई पुन्हा चर्चेत

यानंतर आता आणखी एका सुपरस्टार खानमुळं अॅड. अमित देसाई चर्चेत आले आहेत. हा खान म्हणजे अर्थात शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान. आर्यन खान सध्या कॅडिलिया क्रूझवरील रेव्ह पार्टीमुळं चर्चेत आला आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी त्याला एनसीबीनं अटक केली होती. आत्तापर्यंत अॅड. सतीश मानेशिंदे हे आर्यनची केस लीड करत होते. मात्र, दोनदा आर्यनचा जामीन कार्टानं फेटाळला आणि ८ ऑक्टोबर रोजी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. मात्र, आता ही केस अॅड. अमित देसाई लीड करणार आहेत.

हेही वाचा: RSS मध्ये महिलांचाही समावेश?; भागवतांच्या दसरा भाषणाकडे लक्ष

आर्यन खानच्या अटकेनंतर पहिल्यांदा सलमान खानने शाहरुखच्या मन्नत बंगल्यावर धाव घेतली होती. त्यानंतर काल पुन्हा एकदा सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांनी दोघांनी शाहरुख खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली. या भेटीतच आर्यनसाठी वरीष्ठ विधीज्ञ अमित देसाई यांच्या नावाची शिफारस झाल्याची शक्यता आहे.

आर्यनसाठी असा केला युक्तीवाद

दरम्यान, आर्यन खानच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी सुरु असताना अॅड. अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. त्यांनी म्हटलं, "आम्ही पूर्णपणे कोर्टावर अवलंबून असून आम्हाला न्याय मिळेल अशी खात्री आहे. आर्यन खानजवळ कुठलेही ड्रग्ज सापडलेले नाहीत. तरीही एनसीबी त्याचा जामीन रद्द करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या आशिलाचे स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. आर्यन आधीच एका आठवड्यासाठी तुरुंगात आहे. जामीनावरील सुनावणीला तपासावर अवलंबून राहण्याची गरज नाही. मी जामिनासाठी युक्तिवाद करत नाही, मी फक्त तारखेसाठी बोलतो आहे. त्यामुळे आम्ही उद्याही सुनावणीसाठी तयार आहोत." अॅड. देसाई यांच्या या युक्तीवादानंतर कोर्टानं ही सुनावणी उद्यापर्यंत (गुरुवार) पुढे ढकलली. त्यामुळे आता उद्या दुपारी २.४५ वाजता ही सुनावणी होणार आहे.

आर्यनच्या पाठीशी सेलिब्रेटी

आर्यन खानला सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे ८ ऑक्टोबरपासून तो मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात आहे. आर्यन खानमुळं चिंतेत असलेल्या शाहरुख खानच्या पाठीशी अनेक सेलिब्रेटी उभे राहिले आहेत. यामध्ये पूजा भट्ट, हृतिक रोशन यांचा समावेश आहे.

loading image
go to top