esakal | प्रत्येकाच्या डोक्यावर ५४ हजारांचे कर्ज; रक्कम गेली कुठे?- रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

NCP MLA rohit pawar question to BJP State President chandrakant patil on potholes

प्रत्येकाच्या डोक्यावर ५४ हजारांचे कर्ज; रक्कम गेली कुठे?- रोहित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न विचारत मागील पाच वर्षात सरकारने काय केले याचा जाब विचारला आहे. यावेळी त्यांनी माजी बांधकाम मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निषाणा साधला आहे. रोहित पवार म्हणतात,  महाराष्ट्राचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटलांनी एक घोषणा केली होती की, इथून पुढे राज्यात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही. दादांनी ही घोषणा करून आता एक वर्ष होत आलं, रस्त्यावरचे खड्डे तर मुजले नाहीतच पण या सरकारने राज्याच्या तिजोरीला मात्र मोठा खड्डा पाडला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

आज राज्यावर जवळपास ६ लाख ७१ हजार कोटी रुपयांच कर्ज आहे, सरासरी हिशोब केला तर राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर ५४ हजार रुपयांचा बोजा पडला आहे. मला मान्य आहे की राज्याचा कारभार चालवताना कर्ज काढण्याची गरज भासू शकते, आघाडी सरकारच्या काळात देखील कर्ज काढलं गेलं होतं पण त्याकाळात काढलेल्या कर्जातून होणारी कामे आपणा सर्वांना दिसत होती. आज समस्या हीच आहे की गेल्या पाच वर्षात कर्जे तर भरमसाठ काढली गेली परंतु त्यामुळे ना शेतकरी कर्जमुक्त झाला, ना युवकांना रोजगार मिळाला, अहो रस्त्यावरचे साधे खड्डे देखील मुजले नाहीत मग ही रक्कम नेमकी गेली कुठे? असा थेट प्रश्न करत रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न केला आहे.

शरद पवारांभोतीच्या 'खंजारीची जन्मकथा'

रोहित पवार पुढे म्हणतात, पण आता जनतेच्या हक्काचं सरकार सत्तेत आहे, राज्याची आर्थिक अवस्था पूर्वीसारखी मजबूत करून राज्याच्या विकासाला गती कशी देता येईल यावर आमचं काम सुरू देखील झालं आहे, या महाविकास आघाडीचा एक सदस्य म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की आपलं हे सरकार महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशात अग्रेसर बनवणार. माझी फक्त विरोधी पक्षाला एकच विनंती आहे की, तुमच्या काळात झालेल्या धोरणात्मक चुका सुधारून राज्याला पुन्हा एकदा योग्य दिशेने घेऊन जाण्याचं काम सुरू झालं आहे आपण देखील विरोधी पक्षाची भूमिका योग्यप्रकारे निभावत आम्हाला सहकार्य करावं.

loading image