रोहित पवारांच्या नावाने संघटना, कार्यकर्त्यांना म्हणाले, हे अयोग्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit pawar

'रोहित पवार युवा ब्रिगेड' या नावाने नांदेडच्या काही तरुणांनी ही संघटना सुरु केली होती. कार्यर्त्यांनी आपापसात पदे तयार करून ती वाटून देखील घेतली होती.

रोहित पवारांच्या नावाने संघटना, कार्यकर्त्यांना म्हणाले, हे अयोग्य

पुणे : राष्ट्रवादीच्या युवा आमदारांच्या नावे अराजकीय संघटना सुरु करण्यात आल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यभरात रंगत आहे. यासंदर्भात रोहित पवारांनी खुद्द प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या नावे स्वतंत्र अराजकीय संघटना सुरु करणं बरोबर नाही, असं मत त्यांनी व्यक्त केले आहे.  रोहित पवार यांच्यावर विशेष प्रेम असणाऱ्या नांदेडच्या काही तरुणांनी त्यांच्या नावे स्वतंत्र अशी अराजकीय संघटना सुरू केली होती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या राजकीय संघटनेचे आपण सदस्य असून अशाप्रकारे स्वतंत्र संघटना उभी करणे योग्य नसल्याचे त्यांनी ट्विटरच्या माध्यमातू स्पष्ट केले आहे.  

अजितदादा खरं बोलले अन् जमिन लाटलेल्यांना मिरची झोंबली

'रोहित पवार युवा ब्रिगेड' या नावाने नांदेडच्या काही तरुणांनी ही संघटना सुरु केली होती. कार्यर्त्यांनी आपापसात पदे तयार करून ती वाटून देखील घेतली होती. शिवाय या संघटनेमार्फत काही सामाजिक कार्यदेखील सुरु करण्यात आले होते. परंतु, स्थापनेपूर्वी अथवा स्थापनेवेळी रोहित पवार यांची कसल्याही प्रकारे पूर्वपरवानगी घेतली नव्हती अथवा त्यांच्याशी बोलणीदेखील या तरुणांनी केली नव्हती. निव्वळ नांदेडच नव्हे तर या संघटनेचा नाशिक-लातूरपर्यंत विस्तारदेखील या तरुणांनी केलेला होता.  या साऱ्या गोष्टी समजताच रोहित पवारांनी  या हौशी कार्यकर्त्यांना आपल्या सौम्य भाषेत एकप्रकारे समज देऊन असे कृत्य करणे उचित नसल्याचेच कळवले आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या राजकीय पक्षाचा मी एक सदस्य असून आपण सगळे मिळून सामाजिक काम करत राहू. मी सदैव तुमच्यासोबतच राहीन, अशीही गवाही रोहित पवारांनी या तरुणांना दिलेली आहे. आपल्या नावे व्यक्तिस्तोम माजवणारी अशी एखादी नवीन संघटना काढण्याऐवजी आपल्या पक्षाचेच काम या युवकांनी जोमाने आणि गतीने पुढे न्यावे, अशी अप्रत्यक्ष इच्छाच त्यांनी या ट्विटमधून व्यक्त केल्याचे दिसून येते.   

केंद्र सरकारचे फेसबुकला पत्र; PM मोदींबद्दल कर्मचाऱ्यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप

रोहित पवार हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत. त्याआधीपासूनच रोहीत पवार यांची सोशल मीडियावर जबरदस्त लोकप्रियता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले एक नवे आणि सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे तरुण पाहतात. त्यांच्या याच लोकप्रियेतेतून असा प्रकार घडून आले असल्याचे दिसून आले आहे.  आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले की,  माझ्यावर प्रेम करणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या नावे अराजकीय संघटना सुरू केल्याचं समजलं. या सर्वांना माझी विनंती आहे की,मी #NCP चा आमदार असताना अशी स्वतंत्र संघटना काढणं योग्य नाही. त्याऐवजी आपण एकत्रितपणे सामाजिक काम करत राहू. कार्यकर्ता म्हणून मीही नेहमीच तुमच्यासोबत राहील.

Web Title: Ncp Mla Rohit Pawar Reacton Independent Organization Related Viral News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Rohit Pawar
go to top