esakal | रोहित पवारांनी फोटो ट्विट करून सांगितले आपले मत
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित पवारांनी फोटो ट्विट करून सांगितले आपले मत

पवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसत असल्यानंतर रोहित पवारांनी महाराष्ट्राचा लोकनेता असे म्हणत शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट केला आहे. या फोटातून त्यांनी ते स्वतः शरद पवारांसोबत असल्याचे संकेत दिले आहेत. 

रोहित पवारांनी फोटो ट्विट करून सांगितले आपले मत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्याचे स्पष्ट होत असताना आता पवार कुटुंबातील सदस्य आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या रोहित पवार यांनी फोटो ट्विट करून शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पार्थ पवार, सुनेत्रा पवार राजभवनात उपस्थित होत्या. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी अजित पवारांच्या पाठिशी नसल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार फुटतील असे वाटत नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचेच सरकार येईल असे म्हटले आहे.

पवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले

पवार कुटुंबात फूट पडल्याचे दिसत असल्यानंतर रोहित पवारांनी महाराष्ट्राचा लोकनेता असे म्हणत शरद पवारांसोबतचा फोटो ट्विट केला आहे. या फोटातून त्यांनी ते स्वतः शरद पवारांसोबत असल्याचे संकेत दिले आहेत.