Accident News: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मामाचा कार अपघातात मृत्यू

बीड गेवराई रस्त्यावरील धुळे-सोलापूर महामार्गावर झाला अपघात
Accident News
Accident NewsEsakal

राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे मामा आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव रायजादे यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. धुळे- सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात माणिकराव रायजादे यांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात क्षीरसागर यांचा मावस भाऊ या अपघातात जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील मूळचे माणिकराव रायजादे हे त्यांच्या दिवंगत बहीण, राष्ट्रवादीच्या आमदार संदीप क्षीरसागर यांच्या आई रेखाताई क्षीरसागर यांच्या धार्मिक विधीसाठी दर महिन्याला बीडला जातात. हे धार्मिक विधी आटोपल्यानंतर आपल्या मुलासह नाशिकला परतत असताना हा भीषण अपघात झाला आहे.

Accident News
Governor of Maharashtra : नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे…; कोश्यारी पायउतार होताच राष्ट्रवादीची खोचक टीका

दरम्यान अचानक गाडी डिव्हायडरला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात माणिकराव रायजादे यांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्यांचा मुलगा प्रीतम रायजादे हा जखमी झाला आहे. प्रीतम रायजादे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Accident News
New Governor Ramesh Bais: कोण आहेत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com