Ajit Pawar: बंडोबा झाले थंडोंबा? अजित पवारांच्या शपथविधीला गेलेले आमदार शरद पवारांच्या गाडीत!

अजित पवारांच्या शपथविधीला गेलेले आमदार शरद पवारांच्या गाडीत
Ajit Pawar
Ajit PawarEsakal
Updated on

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रविवारी मोठा राजकीय भूकंप घडला आहे. पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 40 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर शरद पवार या संपूर्ण घटनेनंतर अॅक्शनमोडमद्धे आले आहेत. (Latest Marathi News)

काल अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केलं. त्यांनी विरोधीपक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊन मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का आहे. मात्र काल अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेताना जे आमदार हजर होते, त्यातीला काही आमदार पुन्हा एकदा शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आलेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Vinod Tawde: महाराष्ट्रात राजकीय भूकंप अन् तावडे कर्नाटकात.. विरोधी पक्षनेता ठरवण्याची मिळाली जबाबदारी

तर काल अजित पवार मंत्रिपदाची शपथ घेताना राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे देखील उपस्थित होते. मात्र आज हे तीनही आमदार आज शरद पवार यांच्यासोबत दिसून येत आहेत.(Latest Marathi News)

राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर आज शरद पवाराचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी कराडमध्ये दाखल झाले आहेत. शशिकांत शिंदे यांच्यासोबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि मकरंद पाटील हे देखील शरद पवार यांच्या गाडीमध्ये दिसून आले यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.(Latest Marathi News)

Ajit Pawar
NCP Political Crisis: प्रफुल पटेल, देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात? भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खलबतं सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
During the Janseva Saptah inauguration in Manchar, leaders highlighted Ajit Pawar's role in irrigation, healthcare, education and infrastructure projects.
The factory will also organise village-level farmer meetings on AI-based sugarcane farming from July 27 to August 2.
Marathi News Esakal
www.esakal.com