अजित पवारांनी रात्री सांगितले एक आणि सकाळी घडले एक; आमदारांची प्रतिक्रिया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

काय घडलं पत्रकार परिषदेत?
राजभवनात आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला राष्टवादी काँग्रेसचे 12 ते 15 आमदार उपस्थित होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार पत्रकार परिषदेत उपस्थित होते. यात बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे, सुनील भुसार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या तिन्ही आमदारांनी आपण, शरद पवार यांचे नेतृत्वच मान्य करत असून, यापुढे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार असल्याचे सांगितले. 

मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अक्षरशः पळवून नेऊन, राज्यात सरकार स्थापनेचा डाव साधल्याचं स्पष्ट होत आहे. आज, वाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात शरद पवार यांनी, अजित पवारांसोबत गेलेल्या तीन आमदारांना पत्रकार परिषदेत समोर आणले. त्यात कोणतिही माहिती न देता राजभवनावर नेण्यात आल्याची माहिती या तिन्ही आमदारांनी दिली. रात्री फक्त बोलावून घेतले आणि सकाळी थेट राजभवनात नेले, अशी प्रतिक्रिया या आमदारांनी दिली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

काय घडलं पत्रकार परिषदेत?
राजभवनात आज सकाळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला राष्टवादी काँग्रेसचे 12 ते 15 आमदार उपस्थित होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आमदार पत्रकार परिषदेत उपस्थित होते. यात बीड जिल्ह्यातील आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. राजेंद्र शिंगणे, सुनील भुसार यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. या तिन्ही आमदारांनी आपण, शरद पवार यांचे नेतृत्वच मान्य करत असून, यापुढे पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच काम करणार असल्याचे सांगितले. 

पवार कुटुंबात उभी फूट; सुप्रिया सुळेंचे डोळे पाणावले

आमदार काय म्हणाले?
याबाबत डॉ. राजेंद्र शिंगणे, 'काल रात्री उशिरा अजित पवार यांच्याकडून मला सकाळी सात वाजता भेटण्यासाठी निरोप आला. काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करायची असल्याचे त्यांनी सांगितले होते. गटनेत्यांनी बोलवल्यामुळं आम्ही त्यांच्या बंगल्यावर भेटलो. हळू हळू इतर आमदारही आले. आम्हाला तेथून राज भवनावर घेऊन जाण्यात  आलं. काय चाललंय हे काहीच कळत नव्हतं. थोड्याच वेळात तिथं चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, हे भाजप नेते तेथे उपस्थित झाले. त्यावेळी आम्हाला सगळ्याचा अंदाज आला. या सगळ्याची पुसटशी कल्पना नव्हती. खूप अस्वस्थता होती. पण, राज भवनातून बाहेर पडल्यानंतर थेट शरद पवारसाहेंबाच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.'

अजित पवारांना भाजपने ब्लॅकमेल केलं; तेही परत येतील : संजय राऊत

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLAs statement about Ajit Pawar with BJP and takes oath