राष्ट्रवादीच्या युवतींचे कर्जमाफीसाठी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

मुंबई - ऐन निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतीमालाला रास्त भाव या मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली आहे. राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

शेतीमालाला हमीभाव नाही आणि नोटबंदीमुळे मजुरांना द्यायला पैसे नाहीत, या विचित्र कोंडीत राज्यातील अनेक शेतकरी सापडले आहेत. अशाच परिस्थितीमुळे आलेल्या नैराश्‍यातून येवला तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने पाच एकरांतील कांद्याचे पीक जाळून टाकले. निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेचा राजकीय लाभ उठविण्यासाठी राष्ट्रवादीने आंदोलन केले. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा त्वरित करावी, तसेच उत्पादन खर्च अधिक 50 टक्के इतका हमीभाव शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणी करणारे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले. यावर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात आले.

Web Title: NCP Movement of the girls for debt relief