'शिवस्वराज्य यात्रा' घेऊन अमोल कोल्हे पुन्हा मैदानात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत काही गावे पूरग्रस्त झाल्याने 6 ऑगस्टला स्थगित करण्यात आली होती.

मुंबई : राज्यातील कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे राज्यात सुरू झालेल्या सर्व प्रचार यात्रा स्थगित करण्यात आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्राही स्थगित करण्यात आली होती. आता येत्या 19 ऑगस्टपासून या यात्रेला पुन्हा सुरवात होणार आहे. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. 

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत काही गावे पूरग्रस्त झाल्याने 6 ऑगस्टला स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते पूरग्रस्तांच्या मदतीला धावले होते.  

पूर ओसरल्यानंतर तेथे पुनर्वसनाचे काम सुरू झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा पुन्हा सुरू होणार आहे. पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या यात्रेला सुरूवात होणार आहे. 19 ते 26 ऑगस्टपर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातील विविध भागांत जाणार असून पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MP Amol Kolhe starts ShivSwarajya Yatra from 19 August