अमरावती हिंसाचार | नवाब मलिकांकडून भाजप नेत्याची Audio Clip शेअर, गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nawab malik

अमरावती हिंसाचार | नवाब मलिकांकडून भाजप नेत्याची Audio Clip शेअर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : अमरावती हिंसाचारप्रकरणी (amravati violence) काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (ncp nawab malik) यांनी भाजप नेत्यावर निशाणा साधला आहे. भाजप नेत्याची एक ऑडिओ क्लिप शेअर करत मलिकांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

चिथावणीखोर भाष्य केलं असल्याचा मलिकांचा आरोप

भाजप नेते डॉ.अनिल बोंडे यांच्यावर चिथावणीखोर भाष्य केलं असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता. तसेच आता अनिल बोंडे यांची एक ऑडिओ क्लिप शेअर करत पुन्हा अनिल बोंडेंवर मलिकांनी निशाणा साधला आहे. भाजप सरकारच्या काळात एकही दंगल घडत नाही परंतु विरोधी पक्षाच्या सरकारच्या वेळी दंगल घडते हि वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती असल्याचे अनिल बोंडे यांनी या ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे

हेही वाचा: 'झूठ की सारी दीवारों को गिराते जाएँगे’, नवाब मलिकांचा इशारा

काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?

अमरावती हिंसाचार प्रकरणी एक ऑडिओ क्लिपचा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडिओत कॉन्फरन्स कॉल झाला असल्याचे दिसत आहे. यामध्ये अनेक लोकं सहभागी असताना भाजप नेते डॉ. अनिल बोंडे हे संभाषण करत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासह गुजरातमधील दंगलीवर भाष्य केलं आहे. भाजपचे सरकार आल्यास दंगल होत नाहीत परंतु भाजपचे सरकार नसल्यास दंगल होते असे त्यांनी म्हटलं आहे. ही दंगल मुस्लिम भागात अधिक होते याचे कारण त्यांना नेत्यांचे संरक्षण आहे. ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात फडणवीस सरकराच्या काळात एकही दंगल झाली नव्हती असे अनिल बोंडे यांनी म्हटलं आहे

हेही वाचा: बुलढाणा - आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

loading image
go to top