NCP Political Crisis: "लेखी द्या.." शरद पवारांच्या नावावरून सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Supreme Court On NCP Party And Symbol Hearing: केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना दिलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
Supreme Court On NCP Party And Symbol Hearing
Supreme Court On NCP Party And Symbol HearingEsakal

Supreme Court On NCP Party And Symbol Hearing: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांना दिलं. त्यानंतर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.

शरद पवार गटाकडून दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार हे आमच्या लोकप्रियतेचा वापर करत असल्याचा दावा यावेळी शरद पवार गटाने केला. शरद पवार यांचा फोटो वापरण्यावरही त्यांनी आक्षेप नोंदवला. यावर सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरु नका, असे आदेश अजित पवार गटाला दिले आहेत.

Supreme Court On NCP Party And Symbol Hearing
Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट; पुढील ४८ तासांत 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी काय घडलं?

शरद पवार गटाकडून वकील मनु सिंघवी यांनी युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी अजित पवार गट शरद पवारांचा फोटो कसं वापरतात. ही फसवणूक आहे. त्यांच्या लोकप्रियतेचा वापर का केला जातो, असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद सुरू असताना शरद पवार गटाचे वकील मनु सिंघवी यांनी अजित पवार गटाचे शरद पवार यांचा फोटो वापरलेले पोस्टर्स देखील दाखवले.

Supreme Court On NCP Party And Symbol Hearing
Pratibhatai Patil: देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

"ग्रामीण भागात घड्याळ हे चिन्ह प्रसिद्ध आहे. छगन भुजबळ म्हणतात, ग्रामीण भागात हे पोस्टर्स कायम ठेवा कारण आजही शरद पवार यांची लोकप्रियता कायम आहे, असे म्हणत त्यांना आमचा फोटो, घड्याळ वापरण्याची परवानगी देऊ नका ही आमची मागणी आहे?" असा युक्तीवाद सर्वोच्च न्यायालयात अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला निर्देश दिले आहेत.

Supreme Court On NCP Party And Symbol Hearing
Pratibhatai Patil: देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्येत बिघडली; पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू

सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांचं नाव आणि चिन्ह वापरणार नाहीत अस लेखी द्या, असे निर्देश अजित पवार गटाला दिले आहेत. यावर शनिवारी आम्ही प्रतिज्ञापत्र सादर करू, असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार 18 मार्च रोजी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com