Loksabha 2019 : राष्ट्रवादीची पोस्टरबाजी; लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार!

ncp
ncp

मुंबई : भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या मुलांचा पक्षप्रवेश करण्यात येत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आज (गुरुवार) मुंबईत विविध ठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टरवर आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार असा खोचक प्रश्न भाजपला विचारण्यात आला आहे.

नुकतेच काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटीलनंतर राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहित पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरून राष्ट्रवादी व काँग्रेसला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे. भाजपनेही आगे आगे देखो होता है क्या असे म्हटले आहे. भाजपच्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीने काँग्रेसने पोस्टर्स लावत भाजपवर टीका केली आहे.

दादरमधील शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेल्या पोस्टरवर लिहिले आहे, की ज्यांना आम्ही नाकारले, हाकलले त्यांनाच तुम्ही स्वीकारले गोंजारले. आपला पाळणा हलणार की लोकांचीच लेकरं मांडीवर घेणार, बुरा न मानो होली है.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com