गांधी-पवार भेट; नव्या राजकीय समीकरणाची नांदी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 1 November 2019

'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार' असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत सतत सांगत आहेत. यासाठी शिवसेनेनं सत्तेसाठी सर्व पर्याय खुले ठेवले असून भाजपसोबतचा पेच कायम राहणार आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची 4 नोव्हेंबरला दिल्लीत भेट होणार असून राज्यात नव्या राजकीय समीकरणांवर यावेळी चर्चा शक्य असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची अट टाकून शिवसनेने भाजपची कोंडी केली आहे. त्यामुळे भाजपासोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही प्रकारच्या चर्चा आणि त्यासाठीच्या प्रस्तावावर भूमिका घेण्यास सेनेने अद्याप तरी नकार दिला आहे. यामुळे युती असतानाही सत्ता स्थापनेचा दावा करण्यात भाजपला अपयश आले आहे.

- नव्या महाभारताचा लेखक; ठाकरेंचा 'संजय'

दरम्यान 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार' असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत सतत सांगत आहेत. यासाठी शिवसेनेनं सत्तेसाठी सर्व पर्याय खुले ठेवले असून भाजपसोबतचा पेच कायम राहिल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत नव्या आघाडीचा दावाही करण्यात येत आहे. 

- 'पावसात भिजल्यास भविष्य आहे' : नितीन गडकरी

काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनीही भाजप विरहीत सत्ता स्थापन करण्यास अनुकूलता दर्शविली आहे. त्यासाठी शुक्रवारी (ता.1) या नेत्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येते. शरद पवार यांची भूमिका जाणून घेतल्यानंतरच सोनिया गांधी या नव्या समीकरणाबाबत अंतिम निर्णय घेतील, असे काँग्रेसच्या सूत्रांचे मत आहे.

- नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जींचे 'ते' म्हणणे चुकीचे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP President Sharad Pawar and Congress President Sonia Gandhi meet in Delhi on November 4