'अजितदादा डोईजड होतील म्हणून राष्ट्रवादीने CM पद नाकारलं; शिवसेनेच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

ajit Pawar
ajit Pawar esakal

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री होण्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ माध्यम समूहाला दिलेल्या मुलाखतीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं तर डोईजड होतील अशी शंका पक्षातील नेत्यामध्ये असावी अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

ajit Pawar
Baramati: बारामतीत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला! दीड वर्षांच्या बालिकेवर कुत्र्यांचा हल्ला

ते म्हणाले की,अजित पवारांची अनेक दिवसांपासून राज्याचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे. बहुमत असताना देखील राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद घेतलं नाही कारण, ते पद घेतलं असत तर, ते अजित पवारांना द्यावं लागेल, आणि अजितदादांना मुख्यमंत्री पद दिलं तर ते डोईजड होतील.

अशी शंका पक्षात कोणाला तरी आली असेल त्यामुळे नेमानं मिळणारं मुख्यमंत्री पद राष्ट्रवादी पक्षानं नाकारलं अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे.

ajit Pawar
Heat Stroke: नाशिकमध्ये उन्हाचा कहर! उष्माघातामुळे अग्निवीर हर्षल ठाकरेचा मृत्यू

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवार यांची मुलाखत मी पाहिली नाही. कोणाला मुख्यमंत्री व्हायचे असेल तर यात काही गैर नाही, अनेकांना ते आवडते. पण प्रत्येकजण मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आम्ही त्यांना (राष्ट्रवादीचे अजित पवार) शुभेच्छा देतो अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

तसेच राज्यातील राजकारणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीत काय चालले आहे हे मला माहीत नाही, मी वारंवार सांगितले आहे की ते स्वतःला 'वज्रमुठ' म्हणवून घेतात पण त्यात अनेक तडे आहेत, ते 'वज्रमुठ' कधीच असू शकत नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com