पत्रकार परिषदेत शरद पवार भडकतात तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

श्रीरामपूर - माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या संभाव्य पक्षांतरावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आज संतापले. राजकारणात नातेगोते पाहात नाही, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पद्मसिंह पाटील आपले नातेवाईक आहेत. तेही पक्षांतर करणार आहेत, अशा चर्चा आहे. या संदर्भात एका पत्रकाराने श्री. पवार यांना प्रश्न विचारला. पवार यांना प्रश्नाचा रोख आवडला नाही. नात्याचा संबंध काय, असे विचारत त्यांनी पत्रकार परिषदेतून उठून जाण्याची तयारी केली. काही ज्येष्ठ पत्रकारांनी पत्रकार परिषेद पूर्ण करण्याची विनंती पवार यांना केली. संबंधित पत्रकाराला पत्रकार परिषदेतून बाहेर जाण्याची विनंती स्थानिक पत्रकारांनी केली. त्यानुसार, संबंधित पत्रकार बाहेर गेल्यावर पत्रकार परिषद पुन्हा सुरू झाली. 

त्या आधी 'राजकारणात नातेगोते पाहात नाही. पद्मसिंह मित्रही आहेत...', असे उत्तर पवार यांनी या प्रश्नावर दिले. 

श्री. पवार हे नगर जिल्ह्याच्या दाैऱ्यावर आहेत. गुरूवारी त्यांनी राहुरी कृषी विद्यापीठातील उपक्रमांची पाहणी केली. आज रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी ते श्रीरामपूरमध्ये आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP senior leader Sharad Pawar angry in Press conference