Sharad Pawar: घडामोडींना वेग! शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं | NCP News Updates | Maharashtra Political News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar News | NCP News Updates | Maharashtra Political News

घडामोडींना वेग! शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईत बोलवलं

मुंबई : शिवसेनेचे नेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिंदे यांनी बंड पुकारल्याने शिवसेनेसोबत महाविकास आघाडी सरकार देखील अडचणीत आले आहे. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. (Sharad Pawar News)

शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांची बैठक घेतली त्यानंतर राज्यीतील सर्व आमदारांना मुंबईला पाचारण करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहाता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईत बोलवण्यात आले आहे. शिवसेने देखील सर्व आमदारांना पत्र पाठवले आहे.

हेही वाचा: 'ईडी'च्या 11 तास चौकशीनंतर परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर महाविकास आघाडीतर्फे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत चर्चाच झाली नसल्याची माहिती आहे. नियमित विषयावर चर्चा करीत बैठक संपल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

हेही वाचा: राजीनामा द्यायचा की नाही हा निर्णय उद्धव ठाकरेंचा - एकनाथ शिंदे

Web Title: Ncp Sharad Pawar Call All Np Mla To Mumbai Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top