Sharad Pawar On Bhujbal : भुजबळ सोडून गेल्याचं दुःख वाटतं का? शरद पवार म्हणाले, तो माझा दोष…

NCP Sharad Pawar On Chhgan Bhujbal revolt ajit pawar ncp crisis
NCP Sharad Pawar On Chhgan Bhujbal revolt ajit pawar ncp crisis

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली.यानंतर शरद पवार हे जोमाने पक्षबांधणीच्या कामाला लागले आहेत. पक्षातील बंडानंतर त्यांची आज पहिल्यांदाच छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा होत आहे. या सभेपूर्वी शरद पवरांनी नाशिक येथे पत्रकारपरिषद घेतली.

अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्यासोबत छगन भुजबळ यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान दोन वर्ष तुरुंगातून बाहेर आल्यानंतर भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिलं, त्यांच्या वाईट काळात त्यांच्यावर विश्वास दाखवला. ते भुजबळ तुम्हाला सोडून गेले याचं वाईट वाटतं का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला.

NCP Sharad Pawar On Chhgan Bhujbal revolt ajit pawar ncp crisis
Sharad Pawar News : पवारांना विठ्ठल संबोधणं थांबवा, अन्यथा…; अजित पवार गटाला भाजपची तंबी

पवार म्हणाले की, यातून माणसाचं कॅरेक्टर कळतं. माझ्या स्वतःबद्दल वाटतं इतराबद्दलं नाही, तेही एकाच गोष्टीचं वाटतं की, माझा अंदाज योग्य ठरला नाही, हा माझा दोष आहे मी दुसऱ्याला दोष देणार नाही, असे शरद पवार म्हणाले. २०२४ मध्ये भुजबळांना लोक स्वीकारतील का? असे विचारले असता पवार म्हणाले की, जे आमच्या पासून दूर गेले त्यांच्याबद्दल भाष्यच करायला नको, लोक ठरवतील मी कोण ठरवणार.

NCP Sharad Pawar On Chhgan Bhujbal revolt ajit pawar ncp crisis
Sharad Pawar News : वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलाच नाही! शालिनीताईंचा युटर्न; पवारांच्या मदतीला धावल्या…

या दरम्यान एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या मुंबईतील सभेत शरद पवारांवर जाहीर टीका केली होती. भुजबळ म्हणाले होते की, शरद पवार आमचे विठ्ठल आहेत पण त्यांना बडव्यांनी घेरलं आहे. पवारांनी बडव्यांना बाजूला करून आम्हाला आशिर्वाद द्यावा. तसेच या सभेत भुजबळांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पवारांनी पाडलं त्याचा उल्लेख देखील केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com