esakal | '...म्हणजे अनिल देशमुखांबाबतचा CBI चा तो अहवाल सत्य होता'
sakal

बोलून बातमी शोधा

Nawab-Malik-NCP

'...म्हणजे अनिल देशमुखांबाबतचा CBI चा तो अहवाल सत्य होता'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : तीन दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीन चीट दिल्याची चर्चा होती. तसा सीबीआयचा एक अहवाल (CBI report about anil deshmukh) लिक झाला होता. त्यानंतर आमचा असा कुठलाही अहवाल नाही, असे सीबीआयने स्पष्ट केले होते. मात्र, आज सीबीआयने त्यांच्या एका कर्मचाऱ्याला आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांना ताब्यात घेतले आहे. अहवाल लिक (CBI report leak) केल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचे समजते. त्यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक (NCP spokesperson nawab malik) यांनी टीका केली आहे.

हेही वाचा: VIDEO : लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

नवाब मलिक म्हणाले, ''सीबीआयने त्यांचा कर्मचारी आणि अनिल देशमुख यांच्या वकिलांना अटक केली. याचा अर्थ तो प्राथमिक चौकशीचा अहवाल सत्य आहे. जेव्हा ही कागदपत्रे बाहेर आली तेव्हाच बचाव करण्यासाठी हा गुन्हा दाखल करून कारवाई केली. चार महिने हा अहवाल मॅनेज झालं किंवा कर्मचारी भ्रष्ट आहे, असे सीबीआयला वाटलं नाही. पण लिक झालेला अहवाल न्यायालयात जाऊ शकतो. त्यामुळे वकिलांना अटक करतात. कर्मचाऱ्यांवर कारवाई करतात. तथ्य नसताना गुन्हे दाखल केले जातात.''

प्राथमिक अहवाल आधारावर, अनिल देशमुख यांना फायदा मिळू शकतो. त्यामुळे गुन्हा दाखल केला. परमवीरसिंग यांचे आरोप राजकीय हेतूने होते. सरकारला बदनाम करण्यासाठी होते. प्राथमिक अहवाल बाहेर आल्यावर तो खरा की खोटा सांगितलं नाही. आता त्या अहवालाबाबत गुन्हा दाखल करतात कनिष्ठ अधिकाऱ्याला अटक करतात. अनिल देशमुख यांच्या वकिलाला अटक करतात, असा आरोपही नवाब मलिकांनी केला.

नेमकं काय होतं अहवालात?

दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी अनिल देशमुख यांना सीबीआयनं क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सीबीआय चौकशीचा प्राथमिक अहवाल लीक झाल्यानं त्यावरुन बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या चौकशी अहवालात असं म्हटलं होतं की, "अनिल देशमुख यांनी कुठलाही दखलपात्र गुन्हा केलेला नाही." यासंदर्भात क्लीनचीटच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सीबीआयनं हे सर्व प्रकरण फेटाळत चौकशी सुरु केली होती. याप्रकरणाच्या चौकशीअंती हे दिसून आलं की, देशमुख यांच्या लीगल टीमने सीबीआयच्या काही कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केला होता. या लाच प्रकरणात समावेश असलेल्या सीबीआयच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही सीबीआयनं म्हटलं होत. त्यानुसार, आज सकाळी सीबीआयने अभिषेक तिवारी यांना अटक केली आहे

loading image
go to top