राष्ट्रवादीने वेळ मागितल्यानेच राज्यपालांनी उचलले हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

राजभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांची वेळ वाढवून द्या अशी मागणी राष्ट्रवादीने राज्यपालांकडे केली होती. वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला. मित्रपक्षांशी बोलण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ द्यावा अशी राष्ट्रवादीची मागणी होती. पण, ती टाळण्यासाठी राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने बहुमतासाठी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याकडे वेळ वाढवून द्या असे पत्र पाठवल्याने राज्यपालांनी राष्ट्रपतींकडू राष्ट्रपती राजवटीची शिफारस केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात अखेर राष्ट्रपती राजवट; राज्यपालांकडून शिफारस

राजभवनातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांची वेळ वाढवून द्या अशी मागणी राष्ट्रवादीने राज्यपालांकडे केली होती. वेळ वाढवून देण्यास राज्यपालांनी नकार दिला. मित्रपक्षांशी बोलण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा वेळ द्यावा अशी राष्ट्रवादीची मागणी होती. पण, ती टाळण्यासाठी राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने आज राज्यपालांनी वेळ वाढवून न देण्याच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिवसेनेची बाजू काँग्रेस नेते कपिल सिब्बल मांडणार आहेत. तसेच शिवसेनेने भाजपला जबाबदार धरले आहे.

कोण आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी? जाणून घ्या 

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा गुंता सुटत नसल्याच दिसताच राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. कोशियारी यांनी राष्ट्रपतींकडे याबाबतचा अहवाल पाठविला आहे. त्यांनी ट्विटरवरून याबाबतचे निवेदन देत घटनेनुसार राज्य चालविणे कठीण असल्याचे म्हटले आहे. राज्यातील कलम 356 लागू करण्याची स्थिती असल्याचेही राज्यापालांनी म्हटले आहे. त्यामुळे राज्यात कोणता पक्ष सत्ता स्थापनेचा दावा करेपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होणाऱ हे निश्चित मानण्यात येत आहे.

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचे 'हे' असतील पर्याय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP wants time for prove majority in Maharashtra assembly