NCP: शरद पवारांना धक्का, राज्याबाहेर ‘घड्याळा’साठी राष्ट्रवादीला करावा लागणार अर्ज

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने चिन्हासाठी राष्ट्रवादीला आता परवानगी घ्यावी लागणार
NCP
NCP

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने चिन्हासाठी राष्ट्रवादीला आता परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राबाहेर ‘घड्याळ’ हे पक्षचिन्ह निवडणुकीत वापरायचे असेल तर केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. (NCP will have to apply for clock symbol outside Maharashtra for election national party status cancelled)

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्या दौऱ्यावर असणारे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

NCP
Sharad Pawar on New Parliment House: नवीन संसद भवनाच्या उद्धाटन कार्यक्रमावरुन शरद पवारांचा भाजपला टोला

राज्य पातळीवरील पक्षांना संबंधित राज्याबाहेरही त्यांचे चिन्ह हवे असेल तर त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी लागते. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर चिन्ह द्यायचे की नाही, याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, अशी माहिती श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

NCP
Gopinchad Padalkar on Sharad Pawar : "अहिल्याबाईंच्या जयंतीवरून राजकारण करू नका" पडळकरांची पवार आजोबा-नातवाला खुली धमकी

राष्ट्रीय दर्जासाठी कोणते निकष हवेत ?

लोकसभेतील किमान 2 टक्के जागा पक्षानं तीन वेगवेगळ्या राज्यांमधून जिंकलेल्या असाव्यात.

लोकसभेत 4 खासदार असावेत. शिवाय, 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत किमान 6 टक्के मतं मिळेलेली असावीत.

किमान 4 राज्यांमध्ये पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा असावा.

या तीनपैकी एका निकषाची पूर्तता केली, तरी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळतो. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने दोनच राज्यातून जागा जिंकल्या होत्या. महाराष्ट्राव्यतिरिक्त राष्ट्रवादीचा लक्षद्वीप मधून खासदार 2019 साली निवडून गेला.

NCP
Sharad Pawar : "मी गेलो नाही याचं समाधान वाटतंय…"; पवारांची संसद उद्घाटन सोहळ्यावर जोरदार टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचा झारखंड विधानसभेत एक आमदार आहे, केरळ विधानसभेत 2 आमदार आहेत. नुकत्याच झालेल्या नागालॅंडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 4 आमदार आले आहेत.

नागालँडमध्ये 4 विधानसभेच्या जागा मिळाल्या असल्या तरी 4 राज्यांमध्ये किमान 6 टक्के मतं मिळालेली असण्याचा निकष पूर्ण झाला नाही, यामुळे राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com