...म्हणून 'हे' सात नेते देत आहेत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

संजय मिस्कीन
शुक्रवार, 26 जुलै 2019

राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे खिंडार पडणार असून अनेक विद्यमान आमदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे युतीत प्रवेश करणार आहेत. विद्‌यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता असून पक्षाच्या नेते हवालदिल झाले आहेत.

मुंबई : राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे खिंडार पडणार असून अनेक विद्यमान आमदारांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे युतीत प्रवेश करणार आहेत. विद्‌यमान आमदारांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीत प्रचंड अस्वस्थता असून पक्षाच्या नेते हवालदिल झाले आहेत.

पण हे नेते पक्ष का सोडतायेत याकडे कटाक्ष टाकल्यास लक्षात येते की खालील कारणांसाठी हे आमदार राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आहेत.

दिलीप सोपल : स्थानिक स्तरावरील कार्यकर्त्यांवर अनेक पोलिस गुन्हे आहेत. त्यांचा दबाव सत्तेत जाण्यासाठी आहे. भाजपचे नेते राजा राऊत यांना सत्तेत जावून शह देत पोलिस तक्रारीपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न म्हणून पक्षांतर होणार आहे.

बबन शिंदे : साखर कारखानदारीला सत्तेच अभय मिळावे यासाठी पक्षांतर बबन शिंदे हे पक्षांतर करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

अवधुत तटकरे : रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रेदशाध्यक्ष चुलते सुनिल तटकरे यांच्यासोबत राजकिय स्पर्धा असल्याने अवधुत तटकरे यांची राष्ट्रवादी व्यतिरिक्त पक्षासोबत जाण्याची इच्छा आहे.

राणाजगजितसिंह पाटील : शैक्षणिक संस्था व मेडिकल कॉलेजला सत्तेचं अभय मिळावं ही अपेक्षा असल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

वैभव पिचड : राष्ट्रवादीत निवडणून न येण्याची धास्ती व सत्तेत मंत्रीपदाचे आश्‍वासन मिळाल्याने राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांचे सुपुत्र वैभव पिचड हे भाजपच्या वाटेवर आहेत.

संग्राम जगताप : विजयाची खात्री नाही, म्हणून संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोडत आहेत. तसेच, अनेक गंभीर प्रकारच्या पोलिस गुन्ह्यांची नोंद व कार्यकर्त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा असल्याने सत्तेचे अभय घेऊन हा ससेमिरा सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संग्राम जगताप यांचा राष्ट्रवादीच्या तिकीटावर लोकसभेला नगर दक्षिणमधून भाजपच्या खा. सुजय विखे यांनी पराभव केला होता.

संदिप नाईक : स्थानिक मतदारसंघात भाजप शिवसेनेचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन संदिप नाईक हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ncps seven big leadar may resign