NDA Meeting Delhi: खोत, जानकरांना डावललं; एनडीएच्या बैठकीचे महाराष्ट्रात कुणाला निमंत्रण?

भाजप मोठं शक्तिप्रदर्शन करणार
NDA Meeting Delhi
NDA Meeting Delhi

NDA Meeting Delhi: आज (18 जुलै) रोजी नवी दिल्लीत NDA ची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. भाजप प्रमुख जेपी नड्डा यांनी सोमवारी जाहीर केले की एनडीएच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या बैठकीत 38 पक्ष असतील. विरोधकांच्या बंगळुरू येथील विरोधकांच्या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून दिल्लीत भाजपने दिल्लीत बैठक बोलावली आहे. मात्र महाराष्ट्रातील भाजपच्या काही मित्र पक्षांना बैठकीचे निमंत्रण नसल्यामुळे नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे.

भाजने आज संध्याकाळी 5 वाजता हॉटेल अशोका या ठिकाणी बैठकीचं आयोजन केले आहे. एनडीएविरोधात दोन दिवसांच्या विचारमंथनासाठी विरोधी पक्षांचे नेते सोमवारी बेंगळुरूमध्ये दाखल झाले आहेत. विरोधी पक्षांच्या बैठकीत 28 पक्षांचे नेते असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात ताकद दाखवण्यासाठी विरोधी पक्ष बिगर-भाजप पक्षांसाठी एक व्यासपीठ तयार करत आहेत. दरम्यान विरोधकांच्या एकजुटीला प्रतिसाद म्हणून एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. (NDA Meeting Delhi)


महाराष्ट्रात कुणाला निमंत्रण?-


महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार गट यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष, आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष, रामदास आठवले यांचा आरपीआय (आठवले गट) यांनाही बैठकीच निमंत्रण आले आहे.

अजित पवार आणि इतर बंडखोर नेत्यांनी सोमवारी (17 जुलै) वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, या बैठकीत शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध ठेवण्याची विनंती करण्यात आली. 18 जुलै रोजी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत मी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहितीही प्रफुल्ल पटेल यांनी दिली होती.

NDA Meeting Delhi
राज्यात मेगाभरतीला सुरवात! जाणून घ्या अर्ज करण्याची मुदत, वयोमर्यादा; शिक्षण, सहकार, महसूलसह झेडपी, महापालिका नगरपरिषदांमध्ये नोकरीची संधी

सदाभाऊ खोत, महादेव जानकरांना निमंत्रण नाही -

राज्यात भाजपचे मित्रपक्ष असलेले सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटना, महादेव जानकर यांचा रासप, दिवंगत विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपपासून दूर गेलेल्या पक्षांना जवळ करण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. मात्र सदाभाऊ खोत आणि जानकर यांना डावलल्यामुळे महाराष्ट्रात वेगळे राजकीय तर्क-वितर्क लावल्या जात आहे. साम टीव्हीने याबाबत माहिती दिली आहे. 

NDA Meeting Delhi
Udayanraje Bhosale : 'मी 35 वर्षे सक्रिय आहे, मला समाजकारण समजलं; पण अजून राजकारण लक्षात येत नाही'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com