राज्यात मेगाभरतीला सुरवात! जाणून घ्या अर्ज करण्याची मुदत, वयोमर्यादा; शिक्षण, सहकार, महसूलसह झेडपी, महापालिका नगरपरिषदांमध्ये नोकरीची संधी

सोलापूर महापालिकेच्या ३४० तर जिल्हा परिषदेतील ६३९ पदांची भरती जुलैअखेरीस होणार आहे. त्यात लिपिक, ज्युनिअर अभियंता, ग्रामसेवक अशा पदांचा समावेश आहे. दुसरीकडे सहकार, महसूल व शिक्षण खात्यातील भरती देखील आता ‘टीसीएस’ कंपनीद्वारे भरली जाणार आहेत.
Mantralay
Mantralayesakal

सोलापूर : जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण-तरुणींची नोकरीची प्रतिक्षा आता संपणार असून सोलापूर महापालिकेच्या ३४० तर जिल्हा परिषदेतील ६३९ पदांची भरती जुलैअखेरीस होणार आहे. त्यात लिपिक, ज्युनिअर अभियंता, ग्रामसेवक अशा पदांचा समावेश आहे. दुसरीकडे सहकार, महसूल व शिक्षण खात्यातील भरती देखील आता ‘टीसीएस’ कंपनीद्वारे भरली जाणार आहेत.

लिपिक पदासाठी मराठी व इंग्रजी टायपिंग बंधनकारक आहे. इतर ‘गट- क’ संवर्गातील पदांसाठी बारावी ते पदवीपर्यंतचे शिक्षण बंधनकारक आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचीही साडेसातशे पदांची भरती होणार आहे. मागील सात वर्षांपासून सरकारी नोकर भरतीच्या प्रतीक्षेतील तरुणांना आता पुढील तीन महिन्यांत वेगवेगळ्या शासकीय विभागात नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

राज्य सरकारने टप्प्याटप्याने आता शासकीय पदभरतीला मंजुरी देत विविध विभागातील भरती प्रक्रिया सुरु केली आहे. आता महसूल विभागाकडील तलाठी भरती सुरु असून आता सहकार विभागाचीही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. सहकार विभागाकडून गट-क संवर्गातील गट -क सहकारी अधिकारी श्रेणी-१ व श्रेणी- २ची पदे भरली जाणार आहेत. तसेच वरिष्ठ लिपिक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघू टंकलेखक अशा पदांचाही त्यात समावेश आहे. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत २१ जुलैपर्यंत आहे.

त्यानंतर महापालिका व जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान, आता संचमान्यता झाल्यानंतर ऑगस्टमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. तरुण-तरूणांनी त्यादृष्टिने तयारी करणे आवश्यक आहे.

ठळक बाबी...

  • - खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३८ तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ४३ वयोमर्यादा आहे.

  • - दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४५ इतकी आहे.

  • - ३ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या सरळ सेवा पदभरतीच्या जाहिरातींसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे सवलत आहे.

  • - खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क एक हजार तर इतर संवर्गासाठी प्रत्येकी ९०० रुपयांचे शुल्क असणार आहे.

  • - सोलापूर महापालिका, जिल्हा परिषदेतील एक हजार पदांची सरळसेवा भरती जुलैअखेरीस सुरु होणार

  • - शिक्षण विभागाच्या वतीने साधारणत: ऑगस्टमध्ये शिक्षक भरती होईल

‘टीसीएस’द्वारे होणार जुलैअखेरीस पदभरती

महापालिका व जिल्हा परिषदेसह राज्य शासनाच्या वतीने भरली जाणारी पदे ‘टीसीएस’ कंपनीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी ‘टीसीएस’ कंपनीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीत स्वत:चे खाते तयार करणे आवश्यक आहे. महापालिकेने व जिल्हा परिषदेने शासनाच्या मंजुरीनंतर भरती होणारी पदे व परीक्षेचा अभ्यासक्रम कंपनीला दिला आहे. आता जुलैअखेरीस ही पदभरती सुरु होईल, असा विश्वास संबंधित अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

तलाठी भरतीसाठी मुदतवाढ
राज्यातील तलाठी भरतीसाठी १८ जुलैपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत होती. पण, विविध तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना अर्ज करता आले नाहीत. या पार्श्वभूमीवर, उमेदवारांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार, महसूल व वन विभागाने उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आता २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. साडेचार हजार जागांसाठी सध्या दहा लाखांपर्यंत उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com