दुष्काळी उपाययोजनांमध्ये सुधारणेची गरज - शरद पवार

दुष्काळी उपाययोजनांमध्ये सुधारणेची गरज - शरद पवार

बीड - बीड जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. दुष्काळात सरकारने चारा छावण्या, टॅंकर सुरू केले असले, तरी आणखी सुधारणा करण्याची गरज आहे. केंद्र व राज्य सरकारकडे हा प्रश्‍न मांडणार आहे. त्यावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा आहे. दुष्काळावर सकारात्मक निर्णय झाले, तर सरकारला मदतच करू. दुष्काळात कुठलेही राजकारण नसून, एकत्र काम करण्याची भावना असल्याचे मत राष्ट्रवादी  काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. 

पवार यांनी आज नवगण राजुरी, खडकत (ता. आष्टी), पिंपळवंडी (ता. पाटोदा) आदी ठिकाणच्या चारा छावण्यांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘‘यापूर्वी १९७२, १९७८ व मधल्या काळात झालेल्या दुष्काळाच्या वेळी आपण सरकारमध्ये होतो. १९७२ मध्ये पाणी होते. मात्र, आता मैलोन्‌मैल गेले तरी पाणी दिसत नाही. टॅंकर सुरू असले तरी लोकसंख्येच्या प्रमाणात खेपा नाहीत. अशुद्ध पाणीपुरवठा होतो. चारा छावणी चालकांना देण्यात येणारे अनुदान वाढविण्याबाबत सरकारला बोलून धोरण बदलण्याची विनंती करणार आहोत. फळबागा जळाल्या, तर ३५ वर्षांचे नुकसान होते. त्यामुळे बागा वाचविण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे, पीकविम्याचा फायदा ९५ टक्के शेतकऱ्यांना होत नाही.  सरकारने विमा कंपन्यांची बैठक घेऊन मार्ग काढावा.’’

मागंही अंधार  अन्‌ पुढंही अंधार
कर्जत - पवार व्यथा ऐकून घेणार असल्याने सकाळपासूनच लोक खडकतमध्ये बसून होते. सकाळी अकरा वाजता पवार आले आणि त्यांच्याभोवती शेतकऱ्यांचा गराडा पडला. त्यांना विविध प्रश्‍न विचारून पवार यांनी शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली. शेतकरी म्हणाले, की फळबागा अनेक वर्ष जिवापाड जगवल्या. आता त्यांची राख झाली. ‘रोहयो’ची कामे सुरू केली नाहीत. काय-काय सांगावं, मागंही अंधार-पुढंही अंधार, रडावं तरी कोणापाशी अशी परिस्थिती आहे. अजून दोन महिने कसे जातील याची चिंता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com