मराठी सक्तीसाठी कायदा करण्याची गरज : लक्ष्मीकांत देशमुख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

मुंबई : आजचे पालक त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवत आहेत. सरकारच्या उदासीन धोरणांचा हा परिणाम आहे. विविध राज्यांनी भाषा टिकवण्यासाठी कायदे केले. महाराष्ट्र सरकार याबाबत गंभीर नाही. इंग्रजीचे अतिक्रमण रोखण्यासाठी मराठी शाळांचे सशक्तीकरण करण्यासह इंग्रजी शाळांत मराठी सक्तीची केली पाहिजे. यासह मराठी सक्तीचा कायदा केला पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी येथे केले. 

मराठी अभ्यास केंद्र आणि नूतन विद्यामंदिरच्या संयुक्त विद्यमाने गोरेगाव उन्नतनगर येथील महाराष्ट्र विद्यालयात मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या उद्‌घाटन समारोहाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी देशमुख म्हणाले, की विद्यार्थी कमी झाले म्हणून शाळा बंद करणे योग्य नाही. याप्रसंगी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मराठी सक्तीसाठी आम्ही सोबत असल्याचे सांगितले. यामध्ये कोणाचा विरोध होत असल्यास तो विरोध आम्ही मोडून काढू, असेही ते म्हणाले. 

शाळा बंद करण्याचा कायदा मागे घ्या 

राज्यात मराठी भाषेसाठी सक्तीचा कायदा व्हावा, यासाठी शिवसेनेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन देशमुख यांनी या वेळी केले. शाळा बंद करण्याबाबत केलेला कायदा सरकारने त्वरित मागे घ्यावा. तसेच इंग्रजी शाळांतील पालक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ज्याप्रमाणे आग्रह धरतात, तसाच आग्रह मराठी शाळेतील पालकांनीही धरला पाहिजे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, हा आपला हक्क असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, प्रत्येक तालुक्‍यात पुस्तक विक्री केंद्रे निर्माण व्हावीत, अशी आग्रही भूमिकाही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Need for law for Marathi compulsion says Laxmikant Deshmukh