
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात शिवसेना ठाकरे गटावर केलेल्या आरोपांनी खळबळ उडालीय. यावरून आता राजकीय आरोप प्रत्योरोप सुरू झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटात दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला होता. या आरोपानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहिलंय. यात साहित्य संमेलनाचा राजकीय गैरवापर केला गेल्याचं आणि विरोधकांवर करण्यात आलेल्या आरोपांची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार का असा प्रश्न विचारला आहे.