
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटावर गंभीर असे आरोप केले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलंय. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आता नीलम गोऱ्हे यांच्या या आरोपांवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.