

NEET scam investigation CBI struggles to find proof against Manisha Mandhare
Esakal
नीट पेपरफुटी प्रकरणी आता नवनवे खुलासे होते आहेत. या प्रकरणी सीबीआयकडून कसून चौकशी सुरू केलीय. पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या बायोल़ॉजीच्या प्राध्यापिका मनीषा गुरुनाथ मांढरे यांनाही या प्रकरणी अटक केलीय. एनटीएकडून प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या गोपनीय प्रक्रियेचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत येणारे प्रश्न आधीच सोडवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आता त्यांच्या चौकशीतून अशी माहिती समोर आलीय की प्रश्नपत्रिका फोडताना मनीषा मांढरे यांनी खबरदारी घेतली होती. त्यांना नीटमध्ये विचारले जाणारे प्रश्न तोंडपाठ असण्याचा संशय आहे. क्लासमध्ये शिकवणीवेळी विद्यार्थ्यांना वहीत लिहून घ्यायला लावलेले आणि पुस्तकात मार्क करायला लावलेलेच प्रश्न परीक्षेत आल्याचं समोर आलंय. NEET Paper Leak Case Why Is It Difficult for CBI to Find Evidence