रितेश देशमुखच्या शेतीवर चार कोटी ७० लाखांचे कर्ज? रितेश म्हणतो...

टीम-ई-सकाळ
Tuesday, 3 December 2019

मी व अमित देशमुखने कोणते कर्ज घेतलेच नाही, नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून दिले आहे. सोशल मीडियावर सध्या अभिनेता रितेश देशमुख आणि लातूर शहरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या शेतजमीनाचा 7/12 असलेला उतारा व्हायरल होत आहे. या उताऱ्यावर कर्जाचा बोजा दाखवण्यात येत असून यावर रितेशने स्पष्टीकरण दिले.

मुंबई - मी व अमित देशमुखने कोणते कर्ज घेतलेच नाही, नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट करून दिले आहे. सोशल मीडियावर सध्या अभिनेता रितेश देशमुख आणि लातूर शहरचे काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्या शेतजमीनाचा 7/12 असलेला उतारा व्हायरल होत आहे. या उताऱ्यावर कर्जाचा बोजा दाखवण्यात येत असून यावर रितेशने स्पष्टीकरण दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अमित देशमुख व रितेश देशमुख यांना लातूर तालुक्यातील सारसा येथील 11 एकर जमिनीवर चार कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज दिल्याची कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या 7/12 उताऱ्याचा खुलासा आता रितेश देशमुखने आपल्या ट्विटरवरुन केला आहे.

पानिपतच्या कलाकारांची पुण्यात रंगली मैफल

सामाजिक कार्यकर्त्या मधू किश्वर यांनीही देशमुख कुटुंबीयांच्या शेतजमिनीसंदर्भातील ही कागदपत्रे ट्विट करुन रितेश देशमुखला लक्ष्य केलं होतं. रितेशने मधू किश्वर यांना टॅग करुन या कागदपत्रांसंदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. मी व अमितने कुठलेही कर्ज घेतले नाही, सोशल मीडियावर ही कागदपत्रे चुकीच्या उद्देशाने पसरवली जात असल्याचेही रितेशने म्हटले आहे. त्यामुळे कुठल्याही कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही, असे रितेशने म्हटले आहे.
 

धक्कादायक पोलिस बलात्कार करत असताना दोघांचा पहारा

 

कृपया अशा प्रकारच्या अफवा न पसरवण्याचे आवाहनही रितेशने केले आहे. रितेशच्या ट्विटनंतर मधू यांनी ते फोटो आणि ट्विट डिलीट केलं आहे. मात्र, रितेशने स्पष्टीकरण दिल्याने सोशल मीडियावर चाललेल्या चर्चांना तूर्तास विराम मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neither I nor my brother have availed any loan says Riteish Deshmukh