
हिंदुत्ववाद आणि हिंदू धर्मावरून भूमिका घेत अल्पसंख्यांकांना टार्गेट केलं जात असल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी नाव न घेता नितेश राणे यांना खोचक टोला लगावलाय. सध्या एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय. त्याला वाटतं त्याच्यामुळेच हिंदू धर्म टिकलाय. त्या माणसाचा तसा समज झालाय असं आमदार अनिल परब म्हणाले. गेल्या काही महिन्यांत नितेश राणे यांनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतलीय. यामुळे काही वेळा तणावाची परिस्थितीही निर्माण झालीय. याच पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी केलेली टीका ही नितेश राणेंवर असल्याची चर्चा होत आहे.