कॉर्डिलिया क्रूजवरील कोरोना बाधितांची संख्या 209 वर | Cordelia cruise | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cordelia Cruise

कॉर्डिलिया क्रूजवरील कोरोना बाधितांची संख्या 209 वर

मुंबई - कॉर्डिलिया क्रूजवरील (Cordelia Cruise) 66 जणांना यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होत्. दरम्यान, आता यातील बाधितांची संख्या वाढली असून क्रूजवरील आणखी 143 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे क्रूजवरील कोरोना बाधितांची आकडेवारी 209 वर पोहोचली आहे. 1 हजार 827 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यातील 143 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. 30 डिसेंबर कॉर्डेलिया क्रूझ मुंबईहून गोव्याला निघाले होते. (New 143 Corona Patient Found From Cordelia Cruise)

हेही वाचा: "मोदींचा ताफा अडवल्याप्रकरणी काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी जनतेची माफी मागावी"

कॉर्डेलिया क्रूझवरील (Cordelia Cruise) क्रू मेंबर्सपैकी एका सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्यानंतर गोवा सरकारने क्रूझवरील प्रवाशांची टेस्ट केल्याशिवाय क्रूजवरून खाली उतरण्यास नकार दिला होता. त्यानंतर सर्वांची कोरोना टेस्ट (Coroan Test) करण्यात आली त्यात 66 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, आता यामध्ये वाढ झाली असून क्रूजवरील कोरोनो बाधितांची रूग्णसंख्या आता 209 वर पोहोचली आहे. (Cordelia Cruise Corona Cases turned To 209)

हेही वाचा: मोदींचा ताफा जेव्हा निघतो तेव्हा..जाणून घ्या, कशी असते Security

राज्यातील कोरोनो रूग्णसंख्येचा आलेख वाढताच

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील (Maharashtra New Corona Cases ) कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांसह राज्यासरकाचे टेन्शन वाढले आहे. मुंबईत देखील कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढ होत असून गेल्या 24 तासांत मुंबईत 15 हजार 166 नव्या रुग्णाची भर पडली आहे. तर राज्यात तब्बल 26 हजार 538 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ओमिक्रॉनचे सर्वाधित बाधित रूग्ण महाराष्ट्रात नोंदविण्यात आले आहेत. (Highest Omicron Cases Recorded In Maharashtra )

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top