भ्रूणांचे अवशेष 'डीएनए'साठी प्रयोगशाळेत ; अहवालाची प्रतीक्षा

भ्रूणांचे अवशेष 'डीएनए'साठी प्रयोगशाळेत ; अहवालाची प्रतीक्षा

सांगली : गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपातानंतर दफन केलेल्या भ्रूणांचे अवशेष "डीएनए'साठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अवशेष सापडल्याने तपासात हा मोठा पुरावा मानला जात आहे. अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. दरम्यान, चौगुले हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यात दफन केलेल्या भ्रूणांच्या अवशेषांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. 

चौगुले हॉस्पिटलवर छापा टाकून गर्भपाताचा अड्डा उघडकीस आला. याप्रकरणी मुख्य संशयित डॉ. रूपाली चौगुले, तिचा पती डॉ. विजयकुमार चौगुले, विट्यातील डॉ. अविजित महाडिक, औषध विक्रेता सुजित कुंभार यांना अटक केली आहे. हॉस्पिटलचा परवाना नावावर असणारा डॉ. स्वप्नील जमदाडे अद्यापही पसार आहे. विट्यातील डॉ. हृषिकेश मेटकरी या आणखी एका डॉक्‍टरचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या हॉस्पिटलवर छापा घालण्यात आला.

तेथूनही संशयास्पद कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली. मात्र तो सापडला नाही. डॉ. महाडिक व मेटकरी गर्भलिंगनिदान करून त्यांना चौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी पाठवित असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. त्या बाजूने सध्या तपास सुरू आहे. 

मोठा पुरावा 

कोल्हापूर जिल्ह्यात खोदाई करून भ्रूणांचा शोध घेतला. सांगलीसह कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी, जांभळी व जयसिंगपूर, इचलकरंजी, हातकणंगले आदी गावांत खोदकामे केली. यापैकी एका गावात भ्रूणांचे अवशेष सापडले आहेत. संबंधित महिलेच्या रक्ताचे नमुने व या भ्रूणांचे अवशेष "डीएनए'साठी पाठविले आहेत. अवशेष सापडल्याने तपासात हा मोठा पुरावा मानला जात आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com