महाराष्ट्राचा चित्ररथ येताच झाला जयघोष

महाराष्ट्राचा चित्ररथ येताच झाली घोषणाबाजी...
महाराष्ट्राचा चित्ररथ येताच झाली घोषणाबाजी...

नवी दिल्ली: देशभरात 69वा प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथवर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथांचं संचलन झाले. राजपथावर आज (शुक्रवार) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळ्याने देशाचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच जोरदार घोषणाबाजी झाली.

महाराष्ट्राच्या वतीने साकारण्यात आलेल्या चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती. त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती असून, त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले. या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवले. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागील भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या आहेत. या चित्ररथाची संकल्पना ज्येष्ठ कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी सादर केली आहे.

यावेळी राज्यपथावर राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे सहकुटुंब उपस्थित होते. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच संभाजीराजे उभे राहिले आणि त्यांनी जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणा दिल्या. दरम्यान, राजपथावर 14 राज्यांसह केंद्र सरकारच्या 7 खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे 2 चित्ररथ असे एकूण 23 चित्ररथ सादर होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com