लाच घेण्यासाठी नवा फंडा! फोन कॉलवरून नव्हे तर‌ लाचेसाठी ‘व्हॉट्‌सॲप कॉल’वरून मागणी

बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आता लाचखोरही अत्याधुनिक झाले आहेत. ‘सीडीआर’च्या (कॉल डिटेल्स रिपोर्ट) माध्यमातून आपले पितळ उघडे होऊ नये म्हणून अनेकजण समोरील व्यक्तीला विशेषत: त्यांच्या हस्तकाला व्हॉट्‌सॲप कॉलवरच बोलतात, अशी स्थिती आहे.
Sakal-Exclusive
Sakal-ExclusiveSAKAL

सोलापूर : मागील सात-आठ वर्षांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईनुसार लाच घेणाऱ्यांमध्ये महसूल आणि पोलिस हे दोन विभाग कायम अव्वल ठरले आहेत. पण, बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आता लाचखोरही अत्याधुनिक झाले आहेत. ‘सीडीआर’च्या (कॉल डिटेल्स रिपोर्ट) माध्यमातून आपले पितळ उघडे होऊ नये म्हणून अनेकजण समोरील व्यक्तीला विशेषत: त्यांच्या हस्तकाला व्हॉट्‌सॲप कॉलवरच बोलतात, अशी स्थिती आहे.

Sakal-Exclusive
म्हैसाळ हत्याकांडाचा सूत्रधार सोलापूरचा! गुप्तधनासाठी घेतलेल्या ८० लाखांसाठी 9 जणांची हत्या?

ग्रामीण पोलिस दलातील ७८ कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मुख्यालयात आणून ठेवले होते. शहर पोलिस आयुक्तांनीही अनेकदा काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. तरीपण, लाच घेण्याचे पूर्णत: बंद झालेले नाही, हे विशेष. सर्वसामान्य अन्यायग्रस्तांना न्याय देणारे महत्त्वाचे खाते म्हणून पोलिसांकडे पाहिले जाते. पण, लाच घेण्यासाठी काहींनी खासगी एजंट नेमले असून त्यांचा पोलिस ठाणे किंवा परिसरात सातत्याने वावर असतो. एजटांच्या फोन-पेवर लाचेची रक्कम पाठविण्यास देखील सांगितले जाते, असे अनेकदा समोर आले आहे. त्यासाठी फोन करून बोलल्यावर पुन्हा आपण उघडे पडू शकतो, या भीतीने अनेकजण व्हॉटसॲप कॉलवर बोलतात. त्या कॉलचे डिटेल्स सहजासहजी काढता येत नाहीत, असे सांगितले जाते. त्यामुळे लाचखोर हा नवीन फंडा वापरतात, असे चित्र आहे. तरीदेखील, रोख किंवा ऑनलाइन स्वरुपात लाच स्वीकारणे, लाच मागणे किंवा देणे, हा गुन्हा आहे. कायद्याने काम होत असतानाही कोणी विनाकारण विलंब करत असल्यास त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करावी. कोणी पैसे मागत असल्यास आमच्याकडे यावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संजीव पाटील यांनी केले आहे.

Sakal-Exclusive
राज्यात सत्तापालट होणार? बंडखोर ४१ आमदारांमुळे ठाकरे सरकार अल्पमतात

कारवाईपूर्वी ०० कोड वर्डचा मेसेज

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणावर कारवाई होण्याची शक्यता असते, त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्‌सअप ग्रूपवर ०० असा मेसे पाठविला जातो. सदर बझार पोलिस ठाण्याचे रेल्वे स्टेशन पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांच्यावर कारवाई झाली, त्या दिवशी असाच मेसेज फिरत होता, असे बोलले जात आहे.

Sakal-Exclusive
शिवसेना आमदारांच्या बंडाचे नेमके 'हे' आहे कारण! भाजपच्या मदतीशिवाय आमदारकी अशक्य

...तर त्यांचे थेट निलंबन

कायदेशीर कारवाई किंवा काम करताना कोणी पैसे तथा लाच मागत असल्यास, जाणीवपूर्वक काम अडवून ठेवत असल्यास संबंधित व्यक्तींनी पैसे देण्यापेक्षा आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त राजेंद्र माने व पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे. कारवाईची भीती किंवा खोट्या आरोपाखाली, त्या प्रकरणात काहीही संबंध नसताना अडकवितो म्हणून कोणत्या कर्मचारी, अधिकाऱ्याने पैसे घेतले असल्यास पुराव्यानिशी तक्रार करावी. त्याच्यावर निश्चितपणे निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Sakal-Exclusive
लाच घेणे थांबणार! पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्हीत आता ‘ऑडिओ’ रेकॉर्डिंग

सोलापूर पोलिसांची विशेष बदनामी

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच अवैध व्यावसायिकांकडून लाच घेण्यासंदर्भातील व्हिडिओ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात ठेवला. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी चौकशीचे आदेश दिले. त्याचवेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनीही थेट पोलिस अधीक्षकांपर्यंत हप्ते जातात, असा आरोप केला होता. रेल्वे स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर यांचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यांच्यासोबत आणखी काहीजण दिसतात. दुसरीकडे जेलरोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र शिंदे यांचे एजटांसोबतचे संभाषण लाचलुचपत विभागाने पडताळले आणि कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com