New Parliament : डोक्यावर पदर, नाकात नथ! इंदिरा गांधींनी ठसक्यात नऊवारी नेसून केलेलं विधानभवनाचं उद्घाटन

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या वाद सुरू आहे.
Indira Gandhi Maharashtra Assembly
Indira Gandhi Maharashtra AssemblySakal

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या वाद सुरू आहे. या वादामध्ये इंदिरा गांधी यांचंही नाव भाजपाकडून घेतलं जात आहे. इंदिरा गांधी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन झालं होतं.

महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन १९ एप्रिल १९८१ रोजी झालं होतं. या उद्घाटनासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी महाराष्ट्रात आल्या होत्या. या विधानभवनाच्या इमारतीच्या बांधकामासाठी त्या काळी सुमारे दहा कोटी रुपये खर्च आला होता.

सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून बॅकबे रेक्लेमेशनवर मंत्रालयासमोरील जागेत उभारण्यात आलेल्या विधान भवनाच्या नव्या उत्तुंग व डौलदार

Indira Gandhi Maharashtra Assembly
Parliament Building : जुन्या संसदेचं उद्घाटन कोण केलं होतं माहितीये? असा आहे इतिहास

वास्तुचे उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं. या वास्तुचा उल्लेख पंतप्रधानांनी "लोकशाहीचे मंदिर" असा केला होता.

विधानभवनाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी किरमिजी रंगाची नऊवारी साडी नेसून व डोक्यावर पदर घेऊन व्यासपीठावर येताच हे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केलं होतं.

वाद काय आहे?

भारताच्या नव्या संसद भवनाचं लवकरच उद्घाटन होणार आहे. या इमारतीच्या उद्घाटनावरुन वादाला सुरुवात झाली आहे. हे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते न होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तर इंदिरा गांधींनी उद्घाटन केलं तर चालतं मग मोदींना विरोध का असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com