पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी अधिकाऱ्यांची नावे झाली फायनल! 

maharashtra police
maharashtra police

पुणे : राज्याच्या पोलिस दलातील वरिष्ठ आणि अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या बदल्या शुक्रवारी होण्याची चिन्हे आहेत. पुण्याच्या पोलिस आयुक्तपदी अमिताभ गुप्ता तर पिंपरी-चिंचवडच्या आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती होण्याची चर्चा आहे. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांवर ताण होता. या पार्श्वभूमीवर बदल्या करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, असे समजते. 

नागपूरच्या पोलीस आयुक्तपदी राजेंद्रसिंग, नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी कैसर खलीद यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे, तर मुंबई रेल्वे पोलीसच्या आयुक्तपदी भूषणकुमार उपाध्याय यांची नियुक्ती होणार असल्याची चर्चा आहे.  

पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता असलेले अमिताभ गुप्ता सध्या गृह खात्याचे प्रधान सचिव या पदावर काम करत आहेत.  तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्तपदी येतील, अशी शक्यता असलेले कृष्णप्रकाश सध्या पोलीस महासंचालक कार्यालयामध्ये  कायदा सुव्यवस्था विभागात आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात सहमती झाल्यानंतर बदल्या जाहीर होतील. आज संध्याकाळपर्यंत या बाबतचा निर्णय जाहीर होईल, अशी शक्यता आहे. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर कायम राहतील अशी चिन्हे आहेत. सीआयडीचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी, आशुतोष डुंबरे यांच्याही पुण्यातील नियुक्तीबद्दल चर्चा आहे. मात्र, या बदल्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, मुंबईतील पोलिस वर्तुळात याबाबत जोरात चर्चा आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com