राज्यात नव्या ६ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद; मुंबई मात्र एकही रुग्ण नाही | Maharashtra Omicron Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Omicron Cases
राज्यात नव्या ६ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद; मुंबई मात्र एकही रुग्ण नाही

राज्यात नव्या ६ ओमिक्रॉन रुग्णांची नोंद; मुंबई मात्र एकही रुग्ण नाही

मुंबई : आज राज्यात 6 ओमिक्रॉन संसर्ग (Six new omicron patients) असणाऱ्या रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण बी जे वैद्यकीय महाविद्यालय (BJ medical college) पुणे यांनी नमूद केले आहेत. त्यात पुणे ग्रामीण 3,पिपरी चिचंवड मनपा- 2, पुणे मनपा 1 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत राज्यात एकूण 460 ओमिक्रॉन विषाणू बाधित रुग्ण दाखल झाले आहेत. (New six omicron patient found in Maharashtra today )

हेही वाचा: परळ रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा विनयभंग; मिठी मारत अश्लील शेरेबाजी

यातील 26 रुग्ण हे इतर राज्यातील तर प्रत्येकी 1 रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. 7 रुग्ण ठाणे आणि 4 रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. तर 9 रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.यापैकी 180 रुग्णांना त्यांची आरटी-पीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.आतापर्यंत 1806 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 102 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

मनपा/जिल्हा एकूण रुग्ण

मुंबई              -        327

पिंपरी चिंचवड      -     28

पुणे ग्रामीण          -     21

पुणे मनपा आणि ठाणे मनपा   -13

ठाणे मनपा - 12

नवी मुंबई,पनवेल - प्रत्येकी 8

कल्याण - डोंबिवली - 7

नागपूर आणि सातारा  प्रत्येकी   - 6

उस्मानाबाद  -  5

वसई विरार - 4

नांदेड - 3

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी ,निजामपूर मनपा ,मीरा भाईंदर    -    प्रत्येकी 2 

लातूर, अहमदनगर, अकोला,कोल्हापूर    -   प्रत्येकी 1 

एकूण 460

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top