शिक्षक भरतीची नवी अपडेट! २४ जिल्हा परिषदांमध्ये ‘NT-C’साठी एकही जागा रिक्त नाही; आता प्रतीक्षा शिक्षण आयुक्तांच्या निर्णयाची

राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. त्यात मराठी, उर्दु, कन्नड, हिंदी अशा माध्यमांचा समावेश आहे. परंतु, २४ जिल्हा परिषदांमध्ये मराठी माध्यमांसाठी ‘एनटी-क’साठी एकही जागा उपलब्ध नाही, अशी स्थिती बिंदुनामावलीतून समोर आली आहे.
zp schools
zp schoolssakal

सोलापूर : राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक भरती होणार आहे. त्यात मराठी, उर्दु, कन्नड, हिंदी अशा माध्यमांचा समावेश आहे. परंतु, २४ जिल्हा परिषदांमध्ये मराठी माध्यमांसाठी ‘एनटी-क’साठी एकही जागा उपलब्ध नाही, अशी स्थिती बिंदुनामावलीतून समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथे मंगळवारी (ता. १९) शिक्षण आयुक्तांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानुसार आता आयुक्त सूरज मांढरे काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषदांमधील शिक्षक भरतीपूर्वी ‘टेट’ पार पडली. त्यानंतर शिक्षक भरतीसाठी जवळपास अडीच लाख उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. भरतीसंदर्भातील न्यायालयीन तिढा सुटल्यानंतर आता भरतीला सुरवात होईल, अशी आशा होती. पण, आता ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून आंतरजिल्हा बदलीचा सहावा टप्पा पार पाडला जात आहे. त्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होईल.

मात्र, जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावलीतील रिक्त व कार्यरत पदांवर नागपूर अधिवेशनात आमदार गोपिचंद पडळकर यांनी आक्षेप घेत लक्षवेधी मांडली. त्यासाठी सर्व माहिती घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनाही नागपूरला बोलावून घेण्यात आले होते. त्यासंदर्भातील बैठक मंगळवारी पार पडली. आता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे शिक्षक भरतीसंदर्भात काय निर्णय घेतात, याची उत्सुकता आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला. तरीपण, पुढील आठवड्यात शालेय शिक्षण विभागाकडून भरतीसंदर्भातील स्वतंत्र आदेश निघतील, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. विविध कारणांमुळे अगोदरच लांबलेली शिक्षक भरती, पुन्हा लांबणीवर नको, अशी उमेदवारांची अपेक्षा आहे.

‘या’ झेडपींमध्ये ‘एनटी-क’ला नाहीत जागा

राज्यातील २४ जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मराठी माध्यमांवर ‘एनटी-क’साठी एकही जागा नाही, किंबहुना काही ठिकाणी जागा जास्त झाल्याची स्थिती आहे. त्यात सोलापूर, नगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, सांगली, सातारा, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्हा परिषदांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com