Nilesh Rane Attack News : उद्धव ठाकरेंनी त्यांचा माणूस रोखावा, आम्ही आमचा रोखू; बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

रत्नागिरीतल्या गुहागर येथे भाजप नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भास्कर जाधव यांच्या समर्थकांकडून हा हल्ला झाला आहे. आधी समोरुन हल्ला झाल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला आहे.
Nilesh Rane Attack
Nilesh Rane Attackesakal

BJP Vs Thackeray Group Clash : रत्नागिरीतल्या गुहागर येथे भाजप नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भास्कर जाधव यांच्या समर्थकांकडून हा हल्ला झाला आहे. आधी समोरुन हल्ला झाल्याचा आरोप भास्कर जाधवांनी केला आहे. या घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय झालं?

भाजप नेते तथा माजी खासदार निलेश राणे यांची गुहागर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान गुहागरला जाण्यापूर्वी निलेश राणे यांचा चिपळूण येथे भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी दोन्ही गटात राडा झाला. दोन्ही गटांकडून एकमेकांवर दगडफेक करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राणेंचा ताफा पुढे निघून गेल्यानंतर ताफ्यातील गाड्यांवर मागून दगडफेक करण्यात आली. यावेळी अनेक गाड्यांच्या काचा फुटल्याचे पाहायला मिळाले.

Nilesh Rane Attack
Nilesh Rane Attack News : राणे अन् ठाकरे समर्थक भिडले! चिपळूण येथे निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

या घटनेनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भास्कर जाधव संस्कार आणि संस्कृती सोडून वागत आहेत. राणे परिवारावर त्यांनी उद्धव ठाकरेंसमोर व्यक्तिगत आरोप आणि नक्कल केली. उद्धव ठाकरेंनी त्यांना सपोर्ट केला. असं असलं तरी रॅली काढण्याचा आमचा अधिकार आहे. तशी परवानगी घेतली असावी.

नितेश राणे सातत्याने उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करतात, या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, खरी सुरुवात उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली आहे. सकाळी ९ वाजता संजय राऊत बोलतात मग त्यांना उत्तर द्यावं लागतं. उद्धव ठाकरेंनी राऊतांना आधी रोखावं, मग आम्ही आमच्या बाजूने थांबू.

Nilesh Rane Attack
Dhangar Reservation : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण नाहीच! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

''चिपळूणच्या घटनेची मला संपूर्ण माहिती घ्यायची आहे. सुरुवात मात्र भास्कर जाधवांनी केली, हे स्पष्ट आहे. संजय राऊत ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने त्यांना नितेश राणे उत्तर देतात. उद्धवजींनी काळजी घेतली तर आम्हीही घेऊ. प्रधानमंत्री महोदयांनाही अत्यंत वाईट आणि अश्लील शब्दात बोललं जातं. तुम्ही जसं वागताल तसं लोकं वागतील. चिपळूणच्या घटनेबाबत आम्ही चौकशी करु.'' असं शेवटी बावनकुळे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com