Nilesh Rane News | निष्कर्ष काय निघतो तर, राऊत ठाकरेंची वाट लावायलाच आलेत, निलेश राणेंचा सणसणीत टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Rane on Sanjay Raut

बाळासाहेब ठाकरेंवर संजय राऊत यांनी पिक्चर बनवला, तो भयानक आपटला पण...

'निष्कर्ष काय निघतो तर, राऊत ठाकरेंची वाट लावायलाच आलेत'

सध्या महाराष्ट्रात 'धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाची चांगलीच चर्चा सुरु आहे. नुकताय प्रर्दशित झालेला हा चित्रपट धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारीत आहे. १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून धर्मवीर आनंद दिघे यांच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाल्याच्या भावना व्यक्त होतं आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपाकडू शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. भाजपाचे निलेश राणे यांनी थेट शिवसेना खासदार राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

हेही वाचा: काही फोटो चांगलेही असतात अन् खरेही, मनसे-राष्ट्रवादीत रंगलं फोटोवॉर

निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. यात राणे म्हणतात, 2019 मध्ये स्व. बाळासाहेब ठाकरेंवर संजय राऊत यांनी पिक्चर बनवला. तो भयानक आपटला पण सध्या आनंद दिघे यांच्यावर बनवलेला सिनेमा चांगला चालू आहे. यातून निष्कर्ष काय निघतो तर संजय राऊत हे ठाकरेंची वाट लावायलाच आले आहेत, असे म्हणत त्यांनी खरमरीत टीका केली आहे.

हेही वाचा: संभाजीराजे छत्रपतींची राजकीय कारकीर्द सांगते; 'त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही'

दरम्यान, 23 जानेवारी 2019 रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' चित्रपट प्रदर्शित झाला होता. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली होती. तर अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची कथा लिहिली आहे. यावेळी प्रदर्शित होण्यापूर्वी या चित्रपटाने प्रसिद्धी मिळवली होती. मात्र चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

Web Title: Nilesh Rane Criticized Sanjay Raut On Thackeray Movie Anand Dighe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top