Nilesh Rane : ..तर बाळासाहेब वरून तुमच्यावर चप्पला फेकतील; निलेश राणे आदित्य ठाकरेंवर संतापले

आदित्य ठाकरे सारखा बोगस, भंपक माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही.
Aditya Thackeray vs Nilesh Rane
Aditya Thackeray vs Nilesh Raneesakal

शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची सध्या राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेच्या सातव्या टप्प्यात काल औरंगाबादेतील वैजापूर तालुक्यामधील (Aurangabad Vaijapur) महालगाव इथं सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.

मात्र, या ठिकाणी सभा सुरु असताना गोंधळ पाहायला मिळाला. त्यानंतर आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आल्याची बातमी आहे. याप्रकरणी आता माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय.

आदित्य ठाकरे सारखा बोगस, भंपक माणूस महाराष्ट्रात दुसरा नाही. दगडफेकीचा ड्रामा तयार केला. स्वतःच्या लोकांना दगड मारायला लावलं. झेड प्लस संरक्षणासाठी हे नाटक केल्याची टीका राणेंनी केलीये. निलेश राणेंनी ट्विट करुन आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

Aditya Thackeray vs Nilesh Rane
Political News : 'त्यांनी' मोठं षडयंत्र रचून परमेश्वराचाच पराभव केला; भाजपचा माजी मुख्यमंत्र्यांवर पलटवार

राणे पुढं म्हणाले, अंबादास दानवेंच्या (Ambadas Danve) जिल्ह्यात त्यांचा नेता दगड खातो याची त्यांना लाज वाटायला पाहिजे. खरंतर दानवेंनी राजीनामा द्यायला हवा. वरून जर बाळासाहेब (Balasaheb Thackeray) बघत असतील की आपला नातू दगडी खातोय, तर वरून तुमच्यावर चप्पला फेकतील. आदित्य ठाकरे आता दगडं खातोय, खोटं बोलायचं थांबव नाहीतर चपला खाशील असा निशाणाही राणेंनी ठाकरेंवर साधला.

Aditya Thackeray vs Nilesh Rane
Asaduddin Owaisi : देशात मुस्लिमांसोबत भेदभाव केला जातोय; ओवैसी मोदी सरकारवर का भडकले?

दरम्यान, राणेंनी ट्विट करुन आदित्य इतका बदमाश आहे की स्वतःच्या हितासाठी तो कोणालाही विकू शकतो. आजोबांचा पक्ष यांनी रसातळाला नेला, खरा राग सगळ्यांचा ह्याच्यावर आहे. तरी हा निर्लज्ज्यासारखा फिरतोय. चौकशीत माहिती पडेल की हा हल्ला यानंच घडवून आणला आहे. हा एक नंबर नीच माणूस आहे, अशी टीकाही राणेंनी केलीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com