नीलेश राणेंचे मुख्यमंत्र्यांविरोधात ट्विट; दुसऱ्यांची घरं पाडणाऱ्याला नियतीने घर सोडायला लावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nilesh Ranes tweet against Chief Minister Uddhav Thackeray

...नियतीने घर सोडायला लावले; मुख्यमंत्र्यांनी वर्षा सोडताच नीलेश राणेंचे ट्विट

मुंबई : विरोधकांना सोडा शिवसैनिकांनाच माझ्यावर विश्वास नसेल तर मुख्यमंत्री पदावर मला राहायच नाही. माझ्या एकाही आमदाराने म्हटले की मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नको आहे तर मी पद सोडायला तयार आहे. मी आजच शासकीय निवासस्थान सोडतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. यानंतर त्यांनी रात्री वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडले. यावरून दुसऱ्यांची घरं पाडणाऱ्या व्यक्तीला आज नियतीने घर सोडायला लावले, असे ट्विट नीलेश राणे यांनी केले. (Nilesh Ranes tweet against Chief Minister Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला केला तर शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना चर्चा करण्याचे आवाहन केले. कोणतीही नाराजी होती तर माझ्याशी बोलायचे असते. असे बंड करण्याची गरज नव्हती असे ते म्हणाले होते. आपल्याला पदाचा मोह नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा: मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; ...तर मुख्यमंत्री का झाले

यामुळे ते वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडणार का, असा प्रशन चर्चेला जात होता. त्यांनी म्हटल्याप्रमाणे काही तासांतर वर्षा हे निवासस्थान सोडले. ते आपल्या मातोश्री या निवासस्थानाकडे निघाले. मुख्यमंत्री मतोश्रीकडे येणार असल्याचे समजताच शिवसैनिकांच्या त्यांच्या स्वागतासाठी रसत्यावर प्रचंड गर्दी केली होती. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येत होते.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड अद्याप शांत झालेले नाही. मुख्यमंत्रीही शिवसैनिकांना परत येण्याचे आवाहन करीत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे शासकीय निवास्थान सोडले आहे. यामुळे पुढील घडामोड काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Nilesh Ranes Tweet Against Chief Minister Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top