नऊ आमदरांचे निलंबन मागे; गिरीश बापट यांची घोषणा

Nine MLA's suspension cancelled: Girish Bapat
Nine MLA's suspension cancelled: Girish Bapat

मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गदारोळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 19 आमदारांचे निलंबन करण्यात आले होते. आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव 23 मार्चला मंजूर केला होता. दरम्यान आज (शनिवार) यापैकी 9 आमदारांचे निलबंन मागे घेत असल्याची घोषणा संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.

यावेळी बापट म्हणाले, "23 मार्च ते 31 डिसेंबर 2017 पर्यंत 19 आमदारांचे निलंबन करण्यात यावे, असा प्रस्ताव 23 मार्च रोजी मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी दत्ता भरणे, संग्राम थोपटे यांच्यासह इतर मिळून 9 आमदारांचे निलंबन मागून घेण्यात आले आहे. बाकी इतर 10 आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यात आले आहे.' निलंबित आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार भास्कर जाधव, यांच्यासह अनेक आमदारांचा समावेश आहे.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 18 मार्चला अर्थसंकल्प मांडत असताना, विरोधी पक्षांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत गदारोळ घातला होता. विरोधकांनी टाळ वाजवत कर्जमाफीसाठी आग्रह धरला होता. सभागृहात गोंधळ घालणे, बॅनर फडकावणे, घोषणाबाजी करणे, अवमान करणे, अर्थसंकल्पाच्या प्रती जाळणे, सभागृहाची प्रतिमा मलिन करणे, सभागृहाचा अवमान करणे असे आरोप ठेवून या आमदारांचे निलंबन करण्यात आले होते.

■ खालील सदस्यांचे निलंबन मागे

  1. दत्ता भरणे - इंदापूर, पुणे
  2. संग्राम थोपटे - भोर, पुणे
  3. दीपक चव्हाण - फलटण - सातारा
  4. डी.पी. सावंत - नांदेड उत्तर
  5. अब्दुल सत्तार - औरंगाबाद
  6. अमित झनक - रिसोड
  7. नरहरी जिरवाळ - दिंडोरी, नाशिक
  8. वैभव पिचड- अकोले - अहमदनगर
  9. अवधूत तटकरे - श्रीवर्धन

खालील आमदारांचे निलंबन कायम आहे
■ काँग्रेसचे आमदार

1) अमर काळे - आर्वी मतदारसंघ, वर्धा
2) विजय वडेट्टीवार - ब्रम्हपुरी मतदारसंघ
3) हर्षवर्धन सकपाळ - बुलडाणा
4) कुणाल पाटील - धुळे ग्रामीण
5) राहुल जगताप - चिखली, बुलडाणा
6) जयकुमार गोरे - माण - सातारा

■ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार
7) भास्कर जाधव - गुहागर मतदारसंघ
8) जितेंद्र आव्हाड - मुंब्रा- कळवा, ठाणे
9) मधुसूदन केंद्रे - गंगाखेड
10) संग्राम जगताप - अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com