नागपूर-पुणे मार्गावर तब्बल नऊ शिवशाही सुरु, कोरोनानंतर एसटी महामंडळाने कसली कंबर

अनिक जमधडे
Monday, 12 October 2020

लॉकडाऊननंतर एस. टी. बससेवा पूर्ववत होत आहे. आता नागपूर-पुणे मार्गावर वातानुकूलित आसनी शिवशाही बस सुरु करण्यात आली आहे.

औरंगाबाद : लॉकडाऊननंतर एस. टी. बससेवा पूर्ववत होत आहे. आता नागपूर-पुणे मार्गावर वातानुकूलित आसनी शिवशाही बस सुरु करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी प्रत्येक अर्ध्या ते एक तासाला बससेवा सुरु असणार आहे. कोरोनामुळे जवळपास पाच-सहा महिने एसटी बससेवा बंद होती. कोरोनाच्या काळात एसटीचे दररोज २२ कोटींचे उत्पन्न बुडत होते. मार्च महिन्यानंतर कोरोना काळातील १५३ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये सुमारे तीन हजार ३६६ कोटींचे एसटीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर २० ऑंगस्टपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झाली. दररोज ६६ लाख प्रवाशांना सेवा देणारी एसटी सध्या केवळ ३.८ लाख प्रवाशांची वाहतूक करत आहे. अजूनही एसटीला रोज पंधरा ते वीस कोटींचा फटका बसत आहे. असे असले तरीही आता हळूहळू एसटीची सेवा पूर्वपदावर येत आहे.

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे पुन्हा उघडले, गोदावरी दुथडी वाहू लागली

नवीन आसनी शिवशाही
नागपूर - पुणे मार्गावर नवीन आसनी शिवशाही सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी मोजके थांबे देण्यात आलेले आहे. नागपूर-पुणे (जाताना) सिडको बसस्थानकातून सुटण्याच्या वेळा अशा : २३.५०, ०१.५०, ०२.५०, ०३.५०, ०४.२०, ०४.५०, ०५.२०, ०५.५०, ०७.२० तर हीच बस मध्यवर्ती बसस्थानकातून ००.००, .०२.००, ०३.००, ०४००, ०४.३०, ०५.००, ५.३०, ०६.००, ०७.३० याप्रमाणे आहे. तर पुणे -नागपूर (येताना) वेळा अशा : मध्यवर्ती बसस्थानकातून १७.४५, १९.४५, २०.४५, २१.१५, २१.४५, २२.१५, २२.४५, २३.१५, २३.४५, ०१.१५ तर सिडको बसस्थानकातील वेळा : १७.५५, १९.५५, २०.५५, २१.२५, २१.५५, २२.२५, २२.५५, २३.२५, २३.५५, ०१.२५ याप्रमाणे प्रत्येक अर्ध्या व एक तासाला बससेवा राहणार आहे. बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी केले आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Nagpur-Pune Shivshahi Buses Run Daily Aurangabad News