Aaditya Thackeray : 'शरम वाटतेय, खोके सरकारच्या गद्दारांसाठी...' आदित्य ठाकरेंचा संताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : 'शरम वाटतेय, खोके सरकारच्या गद्दारांसाठी...' आदित्य ठाकरेंचा संताप

मुंबईः निर्भया फंडातून खरेदी केलेली अनेक वाहने शिंदे गटातील खासदार आणि आमदारांना सुरक्षा देण्यासाठी वापरली जात असल्याची बाब समोर आलेली आहे. यावरुन सरकारवर जोरदार टीका होतेय. आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करुन सरकारवर शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे.

या वर्षी जूनमध्ये मुंबई पोलिसांनी 220 बोलेरो आणि 35 एर्टिगा, 313 पल्सर मोटारसायकल आणि 200 अॅक्टिव्हा स्कूटर खरेदी केल्या होत्या. त्यासाठी निर्भया फंडातून ३० कोटी रुपये काढण्यात आले. जुलै महिन्यात ही वाहने विविध पोलिस ठाण्यांमध्ये वाटण्यात आली होती. महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निधी उभा केला होता. परंतु या वाहनांचा वापर इतर उद्देशांसाठी करण्यात येत असल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचाः सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

आदित्य ठाकरे म्हणाले की, एका माणसाच्या भयंकर महत्त्वाकांक्षेपोटी राज्याचं नुकसान होत आहे. निर्भया फंडातून घेतलेल्या एसयूव्ही या खोके सरकारच्या गद्दारांच्या सुरक्षेसाठी वापल्या जात आहेत. शरमेने मान खाली जाण्याचा हा प्रकार असल्याचं आदित्य म्हणाले.

हेही वाचा: PM Narendra Modi : चौथ्या औद्योगिक क्रांतीबद्दल मोदींनी दिली महत्त्वाची माहिती; 'या' देशांचा दिला दाखला

''ज्या राज्यामध्ये महिला खासदाराला मंत्र्याकडून अनेकवेळा शिवीगाळ होते आणि त्यावर कारवाईसुद्ध होत नाही, त्या राज्यात आपण काय अपेक्षा करु शकतो?'' असा खोचक टोला आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.