
कोल्हापूर: न्यायालयीन कोठडीतून जामीन मिळाल्यानंतर आता नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, न्यायप्रविष्ट विषयावर मी काहीही बोलणार नाही. मात्र, मी नेहमीच तपास यंत्रणेला सहकार्य करत आलो आहे. मी करत राहणारही आहे. मला कुणीही अटक केलेली नव्हती. मी स्वत:चं सरेंडर झालो असल्याचं विधान नितेश राणे यांनी म्हटलंय. तसेच आरोग्याच्या प्रश्नावर शंका घेणाऱ्यांबाबतही त्यांनी विधाने केली आहेत. (Nitesh rane first reaction after Bail)
नितेश राणे म्हणाले की, मी विधीमंडळाचा एक सदस्य आहे. दोन वेळा निवडून आलेला लोकप्रतिनीधी आहे. जबाबदारीने वागणं माझ्याकडून अपेक्षित असतं. जेंव्हा जेव्हा माझं सहकार्य मागत होते. तेंव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून सहकार्य करत होतो. पळण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. मी पोलिसांसमोर मी स्वत: सरेंडर झालो. ज्या दिवशी मी हजर राहिलो त्यावेळी मला सर्वोच्च न्यायलयाचं प्रोटेक्शन होतं. तरीही मी हजर राहिलो. मला ज्याप्रमाणे अडवण्यात आलं. माझ्या कार्यकर्त्यांवर चुकीचे आरोप लावण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे मी विचार केला की कुणालाही तसेच सिंधुदूर्गच्या जनतेला यापुढे त्रास नको म्हणून मी सरेंडर झालो. पण म्हणजे मला हे सरकार अटक अजूनही करु शकले नाहीये. मी स्वत:च सरेंडर झालो आहे.
ते पुढे म्हणाले की, पोलिसांना तसेच संबंधित अधिकाऱ्यांना जी जी माहिती हवी होती, जी मदत हवी होती ती मी नेहमीच करत होतो. यानंतरही लागेल तेंव्हाही मी करेन. न्यायालयाने दिलेल्या अटीनुसार मी हजर राहून मी मदत कालही केली होती, आजही करतोय आणि पुढेही करेन. मी तपास कार्यापासून कधीही लांब नव्हतो. कुठल्याही तपास कार्यासाठी मी कधी अडथळे आणले नाहीयेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, मला आश्चर्य याचं वाटतंय की, मला त्रास ज्याचा होतो. त्यानंतर कोल्हापूरवरुन डिस्चार्ज घेतल्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये दोन दिवस ऍडमिट होणार आहे. हा सगळा आरोग्याचा विषय आहे तो न्यायालयीन कोठडी आहे म्हणून करतोय, असं म्हणणारे , जे काही लोक माझं शूगर लेव्हल तपासायचे ते काय खोटे होते का? 152 ब्लड प्रेशर होत. मी काय मशीनमध्ये बोट घातलं होतं का? कुणाच्याही तब्येतीवर असा प्रश्न विचारणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसं आहे का? हाही विचार केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.